महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर अर्शद वारसीनं केलं रणबीर कपूरचं कौतुक - अर्शद वारसीनं शेअर केली पोस्ट

Arshad Warsi and Animal movie : अभिनेता अर्शद वारसीनं रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्याला प्रचंड आवडला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करून रणबीरचं कौतुक केलं आहे.

Arshad Warsi and Animal movie
अर्शद वारसी आणि अ‍ॅनिमल चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 3:52 PM IST

मुंबई - Arshad Warsi and Animal movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अर्शद वारसीनं नुकताचं रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिला. त्यानं या चित्रपटाचं आणि रणबीरचं खूप कौतुक केलं आहे. त्यानं एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं संदीप रेड्डी वंगा यांच्या अ‍ॅक्शन ड्रामा अतिशय सुंदर असल्याचं म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या तीन दिवसात 200 कोटीचा टप्पा पार केला होता. हा चित्रपट लवकरच देशांतर्गत 500 कोटी गाठेल अशी अपेक्षा केली जात आहे.

अर्शद वारसीनं केलं कौतुक :अर्शदनं या 'अ‍ॅनिमल'चं कौतुक करत या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ म्हटलं. यासोबतच त्यानं रणबीर कपूरच्या अभिनयाचे देखील कौतुक केलं आहे. त्यानं त्याच्या पोस्टवर एक्सवर लिहिलं, ''मी काल 'अ‍ॅनिमल' पाहिला, संदीप रेड्डी वंगाचा हा चित्रपट उत्तम आहे. मला वाटतं ऋषीजी आणि नीतूजी भेटले कारण जगाला रणबीर कपूरची गरज होती. या माणसाच्या प्रतिभेला सीमा नाही''. यासोबतच त्यानं अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि 'अ‍ॅनिमल'च्या संपूर्ण टीमचे हा खास चित्रपट दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तेलुगू ब्लॉकबस्टर अर्जुन रेड्डी आणि हिंदी रिमेक कबीर सिंग नंतर 'अ‍ॅनिमल' हा संदीप रेड्डी वंगा यांचा तिसरा चित्रपट आहे.

रणबीरचं वर्कफ्रंट :'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल व्यतिरिक्त अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी रणबीर खूप मेहनत घेतली आहे. 'अ‍ॅनिमल'चे शो सध्या हाऊसफुल्ल आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचं चित्रपटगृहांमध्ये दिसत आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरच्या अभिनयाला आणि त्याच्या लुक्सला अनेकजण पसंत करत आहेत. दरम्यान रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'रामायण पार्ट 1' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'फायटर' चित्रपटामधील अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज ; पाहा पोस्टर
  2. अमिताभ बच्चनसह अनेक सेलेब्सनं 'द आर्चीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला लावली हजेरी
  3. मुंबईत एनसीपीए येथे चार पिढीतील दिग्गज संगीतकार येणार एकाच मंचावर, संगीत रसिकांना मेजवानी

ABOUT THE AUTHOR

...view details