मुंबई- बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या अरमानला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (२० सप्टेंबर) वर्षभरानंतर जामीन मंजूर केला. अरमानला एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. गेल्या एक वर्षापासून कनिष्ठ न्यायालयात अभिनेत्याचा जामीन अर्ज फेटाळला जात होता.
अरमान कोहलीने कोणत्या कारणास्तव मागितला जामीन - याआधी अरमानने काही गोष्टी मांडून जामिनासाठी अर्ज केला होता, ज्यात तो म्हणाला होता की...'अरमान कोहली निर्दोष आहे आणि त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. अरमानविरुद्ध कोणतीही प्रथमदर्शनी केस नाही किंवा कोणताही ठोस पुरावा नाही. NDPS कायद्याच्या कलम 67 अंतर्गत अभिनेत्याविरुद्ध नोंदवलेला जबाब हा एकमेव पुरावा आहे.'
जबाब आणि पंचनामा व्यतिरिक्त, कोहली विरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 27A आणि 29 ला लागू केल्याच्या प्रथमदर्शनी आरोपाला पुष्टी देणारी कोणतीही सामग्री नाही. NDPS कायद्याच्या कठोर तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी फक्त बँक स्टेटमेंट आणि व्हॉट्सअॅप चॅट्स पुरेसे नाहीत.