महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Arjun Rampal : अर्जुन रामपालने वयाच्या ५०व्या वर्षात बनवली दमदार बॉडी.... - अर्जुन रामपालने शेअर केला फोटो

अर्जुन रामपालने त्याच्या चित्रपटासाठी वयात ५०व्या वर्षात दमदार बॉडी तयार केली आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फार देखणा दिसत आहे.

Arjun Rampal
अर्जुन रामपाल

By

Published : Aug 12, 2023, 6:04 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल अलीकडेच त्याचा आगामी अ‍ॅक्शन चित्रपट 'क्रॅक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो 'क्रॅक' चित्रपटासाठी जिममध्ये खूप घाम गाळत आहे. अर्जुन रामपालच्या लूकचे लाखो चाहते आहेत. अर्जुन रामपालची फिल्मी कारकीर्द भलेही सुपरहिट ठरली नसेल, पण त्याच्या देखण्यापणामुळे अनेकजण त्याला पसंत करतात. अर्जुन अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि साईड रोलमध्ये दिसतो. याशिवाय तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो आपल्या मुलासोबत आणि गर्लफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान आता अर्जुन हा ५०व्या वर्षात सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आपली फिटनेस दाखवत आहे.

अर्जुन रामपालची शेअर केले फोटो :अर्जुन रामपालने १२ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे. अर्जुनने ही पोस्ट शेअर करून लिहले, 'आधी आणि नंतर' अर्जुनने जिम करून आपले स्नायू आणखी फिट बनविले आहेत. याशिवाय त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये हॅशटॅग प्रशिक्षण, 'क्रॅक', फिटनेस , गोल्स असे लिहले आहे. अर्जुन त्याच्या आगामी चित्रपट 'क्रॅक'साठी आपली बॉडी बनवत आहे. दरम्यान अर्जुन रामपालच्या या फोटोवर त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने देखील कमेंट केली आहे. गॅब्रिएलाने पोस्टवर लिहिले, 'फायर ईमोजीसह वाट पाहत आहे', असे तिने पोस्ट केले आहे. याशिवाय या पोस्टवर बॉबी देओलने फायर इमोजी शेअर केला आहे. तसेच याशिवाय या पोस्टवर अनेकजण त्याचे कौतुक करत आहे. एका चाहत्याने त्याला 'तू खूप खास दिसतो', असे म्हटले आहे.

अर्जुन रामपालचे वर्कफ्रंट :अर्जुन रामपालने २००१ मध्ये 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अर्जुन शेवटी कंगना रणौत स्टारर 'धाकड़' (२०२२) या चित्रपटात दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तो 'द बैटल और ऑफ भीमा, कोरेगांव', क्रॅक, नास्तिक, ३ मंकीज आणि भगवंत केसरीमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Gadar 2 : 'गदर २' टीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी करणार खास स्क्रीनिंग...
  2. Sara Ali Khan Birthday : कुटुंबासह सारा अली खानने केला वाढदिवस साजरा...
  3. Gadar 2 vs OMG 2 box office: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ चित्रपट 'ओह माय गॉड २'वर पडला भारी...

ABOUT THE AUTHOR

...view details