मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने चार वर्षांपूर्वी अरिक नावाच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर गॅब्रिएलाने एप्रिल २०२३ मध्ये सोशल मीडियावर तिच्या दुसऱ्यांदा आई होणार असल्याची घोषणा केली. दरम्यान आता ग्रॅबिएला दुसऱ्यांदा आई झाली आहे. तसेच अर्जुन हा पुन्हा एकदा पिता झाला आहे. यावेळी अर्जुन खूप आनंदी आहे. त्यामुळे आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने ट्विटरवर लिहिले, 'माझ्या कुटुंबाला आणि मला आज एका सुंदर मुलाचे सौभाग्य प्राप्त झाले, आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.' असे त्याने सांगितले. अर्जुनच्या पोस्टवर अनेक कमेंट सध्या येत आहेत.
अर्जुन आणि गॅब्रिएला चाहते करत आहेत अभिनंदन : अर्जुन रामपालची ही पोस्ट समोर येताच चाहत्यांसह काही स्टार्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहेत. बॉबी देओलने कमेंट करत लिहिले, 'अभिनंदन मित्रा.' राहुल देव यांनी लिहिले, 'बाबा आणि आईचे खूप अभिनंदन.' निर्मात्या प्रज्ञा कपूर यांनी लिहिले, 'अभिनंदन, लहान बाळाला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.' याशिवाय एमी जॅक्सन आणि दिव्या दत्ता यांसारख्या स्टार्सही या जोडप्याला शुभेच्छा दिसल्या आहेत.