महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Arjun Kapoor birthday : गरिब मुलांच्या मदतीसाठी अर्जुन कपूर करणार आवडत्या कपड्यांचा लिलाव - मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री अर्जुनने गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत पार्टी केली. आता अर्जुन कपूर त्याच्या वाढदिवसानिमित्त्याने गरिब मुलांची मदत करणार आहे.

Arjun Kapoor birthday
अर्जुन कपूरचा वाढदिवस

By

Published : Jun 26, 2023, 4:56 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा त्यांच्या नात्यामुळे फार जास्त चर्चेत राहतो. मात्र आज तो वेगळ्या करणामुळे चर्चेत आला आहे. आज २६ जून रोजी अर्जुन ३८ वर्षांचा झाला आहे. या खास प्रसंगी अर्जुनचे चाहते त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तर, काल रात्री अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा यांनी मित्रांसोबत जोरदार पार्टी केली. या पार्टीत मलायका अरोराने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त तिच्या २५ वर्षांच्या आयकॉनिक गाणे छैया-छैयावर डान्स आणि मस्ती केली. अर्जुन कपूरच्या पार्टीतील मलायकाचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अर्जुन कपूर वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी एक उदात्त कार्य करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर त्याच्या आवडत्या ब्रँडेड कपडे विकणार आहे. याद्वारे तो गरीब गरजू मुलांची मदत करणार आहे.

विक्री कुठे होणार? :रिपोर्ट्सनुसार, हा ऑनलाइन सेल ऑस्कर फाउंडेशनवर होणार आहे. ही मुंबईस्थित एनजीओ आहे, जी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आणि तिथे अभ्यासात गुंतण्यासाठी फुटबॉल खेळाचा वापर करते. या संस्थेने १४ हजार गरीब आणि गरजू मुलांना सक्षम केले आहे.

काय म्हणाला अभिनेता अर्जुन कपूर? : त्याच्या ब्रँडेड कपड्यांच्या विक्रीबद्दल अर्जुन कपूर म्हटले, 'या कपड्यांमध्ये माझ्या आनंदाच्या, खास दिवसांच्या आणि माझ्या यशाच्या आठवणी आहेत, ज्या मला या मुलांसोबत शेअर करताना आनंद होत आहे, मला आशा आहे की त्यांना ते आवडेल कारण एखाद्याला मदत करणे हे सर्वात मोठे काम आहे. या चांगल्या कामाद्वारे अर्जुन या मुलांची मदत करणार आहे.

अर्जुन कपूर वर्कफ्रंट : अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर तो, लवकरच अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत 'द लेडी किलर' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर अर्जुन 'कोमाली' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकवरही काम करत आहे. याशिवाय तो 'पठाण' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबतच्या अ‍ॅक्शन चित्रपटामुळेही चर्चेत आहे. अर्जुन कपूर हा शेवटी आस्मान भारद्वाजच्या 'कुट्टे' चित्रपटात दिसला होता, १३ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. Thalapathy Vijay courts controversy : ना रेडी गाण्यात धुम्रपान केल्याबद्दल थलपथी विजयवर खटला दाखल
  2. Kangana Ranaut interview : नेपोटीझम विरोधात जाहीर भूमिका घेणारी पहिली अभिनेत्री, कंगना रनौत!
  3. Adipurush box office day 10 collection: बॉक्स ऑफिसवर आदिपुरुषला थोडा दिलासा, रविवारी कमाईतही वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details