मुंबई :बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंग अलीकडेच औरंगाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर असताना एका चाहत्याने त्याचा हात ओढल्याने तो जखमी झाला. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये गायक त्याच्या चाहत्याला संयमाने शिकवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अरिजित म्हणतो, जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर तुम्हाला मजा करता येणार नाही. हे इतके सोपे आहे. तुम्ही मला असे खेचत आहात. माझा हातात जोरात पकडत आहात. मी कार्यक्रम सोडून देऊ का? त्यानंतर तिथे आलेल चाहते ओरडले 'नाही'. तर नंतर महिलेने अरिजित सिंगला चुकून दुखावल्याबद्दल अनेक वेळा माफी मागितली.
लाइव्ह कॉन्सर्ट :अरिजित पुढे म्हणाला, तुला समजून घ्यावं लागेल. तुम्ही मोठे झाले आहेत. बरोबर? तू प्रौढ व्यक्ती आहेस ना? तू मला असं का ओढलंस? माझा हात आता सुध्दा थरथरत आहे. मी माझा हात हलवू शकत नाही आहे. हात खेचणारी महिलाने अरजितला म्हटले की तू माझ्या समोर होता त्यामुळे मी हात ओढला त्यानंतर अरजित म्हटले की सर्वां समोर येणार ना. मी इथल्या प्रत्येकावर प्रेम करतो .मी सगळ्यांकडे जाईल असे त्याने यावेळी म्हटले. अरिजितचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहे. ज्यामध्ये अरिजित त्याच्या चाहत्यांनसोबत संवाद साधतांना दिसत आहे.