महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा'मध्ये 'द आर्चीज' स्टार वेदांग रैना आलिया भट्टसोबत झळकेल - जिगरामध्ये वेदांग रैना

Vedang Raina with Alia Bhatt in Jigra : वासन बालाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'जिगरा'मध्ये 'द आर्चीज' फेम वेदांग रैना आलिया भट्टसोबत दिसेल. आता यावर वेदांगनं प्रतिक्रिया दिली आहे.

Vedang Raina with Alia Bhatt in Jigra
'जिगरा'मध्ये आलिया भट्टसोबत वेदांग रैना

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 5:23 PM IST

मुंबई - Vedang Raina with Alia Bhatt in Jigra : 'द आर्चीज' स्टार वेदांग रैना आता दिग्दर्शक वासन बालाच्या आगामी 'जिगरा' चित्रपटात झळकणार आहे. वेदांग हा आलिया भट्टसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसेल. या चित्रपटात तो आलिया भट्टच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान 'जिगरा'मध्ये काम करण्याबाबत वेदांगची प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटाबाबत त्यानं सांगितलं, जेव्हा त्याला जिगरामध्ये आलिया भट्टच्या भावाची भूमिका करण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो या भूमिकेसाठी खूप उत्साहीत झाला होता. याशिवाय त्यानं पुढं सांगितलं की, 'ही संधी माझ्यासाठी खूप मनोरंजक असेल.'' आलियाचा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'जिगरा' चित्रपट वेदांग रैना दिसेल : 'जिगरा' चित्रपट आलियाचं बॅनर इटर्नल सनशाइन प्रॉडक्शननं धर्मा प्रोडक्शनसह-निर्मित केला आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा हे आहेत. आलियानं 2022 च्या 'डार्लिंग्स'मधून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होतं. तिचा हा चित्रपट खूप चर्चेत होता. दरम्यान ''वेदांग रैनानं नुकतेच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून पदार्पण केले असून तो इतर चित्रपटांमध्येही काम करण्यास तयार आहे. 'द आर्चीज' चित्रपटमध्ये त्याच्यासोबत अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि डॉटसोबत दिसले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स प्रदर्शित झाला होता.

आलियाचं वर्कफ्रंट :'जिगरा' चित्रपटामध्ये आलिया ही एका वेगळ्याच अंदाजात दिसेल. यापूर्वी या चित्रपटामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये आलिया तिच्या लहान भावाला सांगताना दिसत आहे की, ती त्याला काहीही होऊ देणार नाही. या चित्रपटाची कहाणी बहिण भावाच्या अतूट प्रेम आणि अटळ धैर्याची असेल. सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे. आलिया आणि वेदांग रैना स्टारर हा चित्रपट पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया ती 'बैजू बावरा' या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'ब्रह्मास्त्र 3'मध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. दीपिका स्टारर 'फायटर'चा ट्रेलर रिलीज, पुलवामासह बालाकोटचाही आहे उल्लेख
  2. बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा सुशांतसिंगचा उल्लेख, विकीनं 'ती' आठवण सांगून अंकिताला विचारले प्रश्न
  3. प्रभासचा नवा लूक आला समोर, स्टारर 'द राजा साब'चं पोस्टर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details