मुंबई - Arhaan Khan-Rasha Thadani: अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान चर्चेत आला आहे. आता अलीकडेच अरबाज खानचं दुसर लग्न झालं. या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरहान हा रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत 2 जानेवारी रोजी मुंबईत फिरताना दिसला होता. पापाराझीला अरहान खान आणि राशा थडानीनं पाहिल्यानंतर दोघेही तिथून घाईत निघताना दिसले. व्हिडिओमध्ये अरहाननं पांढऱ्या टी-शर्ट आणि ट्राउझर्स घातला होता. या लूकमध्ये तो देखणा दिसत होता.
अरहान खान आणि राशा थडानीचा व्हिडिओ व्हायरल : दुसरीकडे राशानं डेनिम ब्लू जीन्ससह ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप परिधान केलं होता. यावर तिनं केसं मोकळे सोडली होते. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. अरहान आणि राशा कारकडे वेगानं जात असताना त्यांनी पापाराझींकडे दुर्लक्ष केले. जरी दोघांनामध्ये मैत्री असली, तरीही आता अनेकजण त्याच्या नात्याबद्दल अंदाज लाऊ लागले आहेत. अभिनेत्री रवीना टंडननं अरबाज खानच्या लग्नात मुलगी राशासोबत हजेरी लावली होती. अरबाजच्या लग्नामधील एका फोटोमध्ये अरहान आणि राशा एकत्र दिसत आहेत.