हैदराबाद- संगीतकार ए.आर. रहमानची मुलगी खतिजा ( A.R. Rahman's daughter Khatija ) हिने महत्त्वाकांक्षी उद्योजक आणि ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मद (Riyasdeen Shaik Mohamed ) यांच्याशी लग्न केले आहे. 5 मे रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे दोघांचे लग्न झाले. लग्नाला फक्त जवळचे कुटुंब आणि नातेवाईक उपस्थित होते.
चाहत्यांना आनंदाची बातमी सांगताना, संगीतकार ए.आर. रहमान यांनी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्यासोबतचा एक कौटुंबिक फोटो शेअर केला. "सर्वशक्तिमान या जोडप्याला आशीर्वाद देवो.. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद." रहमानने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.