महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दारू पिणार्‍यांमुळे मध्येच पार्टी सोडायचे ए आर रहमान, वाढदिवसानिमित्य काही रंजक किस्से - संगीतकार आणि गायक ए आर रहमान

संगीतकार आणि गायक ए आर रहमान 6 जानेवारी रोजी 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. अतिशय साधी राहणी आणि उत्तुंग प्रतिभा असलेला हा गायक पार्ट्यामध्ये फारसा रमत नाही. हॉलिवूडने आयोजित केलेल्या एका पार्टीत रहमान गेला असतानाचा किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितला होता.

ए आर रहमान
ए आर रहमान

By

Published : Jan 6, 2023, 1:03 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:34 PM IST

मुंबई- ऑस्कर पुरस्कार प्राप्त भारतीय संगीतकार आणि गायक ए आर रहमान 6 जानेवारी रोजी 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. एआर रहमान केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. जवळपास दशकभरापूर्वी हॉलिवूडमध्ये जबरदस्त काम करून जगभर नाव कमावले होते. आपला अनुभव शेअर करताना रहमानने एका मुलाखतीत अनेक किस्से सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, पूर्वी भारतातील लोकांना परदेशात वेगळी वागणूक दिली जात होती.

स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी जेव्हा त्याला ऑस्कर देण्यात आला होता तेव्हाचेही काही किस्से रहमान यांनी सांगितले होते. अकादमीचा एक भाग असल्याने त्यांना प्रत्येक पार्टीत बोलावले जायचे. परदेशींसोबत तो एकमेव भारतीय व्यक्ती असायचा.

त्याआधी त्याला पार्टीत जाण्याची फारशी संधी मिळाली नव्हती, पण जेव्हा त्याला एका ग्रँड पार्टीत बोलवले होते तेव्हा जेजे अब्राम्स, डिस्ने सगळ्यांनी आमंत्रित केले होते. तो सर्वत्र गेला. रहमानने सांगितले की, जेव्हा तो ऑस्करसाठी लॉस एंजेलिसमध्ये होता तेव्हा त्याने खूप पार्टी केली होती. पण अशा पार्टीत रहमान फारसा रमत नसे. तो लोकांना भेटून परत यायचा. तो कुठेही जास्त काळ थांबला नाही, 10 ते 15 मिनिटांत परत यायचा. रहमानने सांगितले की त्याला मोठ्या आवाजातील संगीत आणि मद्यपानाची मोठी अडचण होत असे. यामुळे त्याला गर्दीच्या ठिकाणी क्लॉस्ट्रोफोबिया जाणवतो.

डिस्नेने 2013 मध्ये आलेल्या 'फ्रोझन' चित्रपटासाठी ही पार्टी आयोजित केली होती. तो दिवस वॉल्ट डिस्नेचा 90 वा वर्धापन दिन होता. ज्यासाठी त्यांचा पुतळा बसवण्यात आला होता. तो त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेत होता, तिथल्या लोकांवर त्याची नजर पडताच सगळे त्याच्याकडे बघत होते. जवळपास 100 लोक होते, त्यापैकी रहमान हा एकमेव भारतीय होता. काहीसा लाजाळू असलेले रहमान जेव्हा परफॉर्मन्सला उभे ठाकतात तेव्हा मात्र समोर असलेला हजारोंचा लोक समुह त्यांच्या मंत्रमुग्ध जादुई संगीताने डोलायला लागतो.

रहमानची प्रतिभा ओळखण्यात बॉलिवूड कमी पडल्याचे मत निर्माते दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले होते. रहमान यांची आंतरराष्ट्रीय मान्यता ही "बॉलिवूडमधील मृत्यूचे चुंबन" असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शेखर कपूर यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''तुम्हाला माहिती आहे तुमची समस्या काय आहे, एआर रहमान? तुम्ही गेला आणि ऑस्कर मिळाले. ऑस्कर म्हणजे बॉलिवूडमधील मृत्यूचे चुंबन आहे. यातून हे सिध्द होते की तुमच्या जवळ बॉलिवूडच्या तुलनेत जास्त प्रतिभा आहे..."

संगीतकार रहमान यांनी अलिकडेच एक मुलाखतीत म्हटले होते की, त्यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या आणि अफवा फिरत आहेत, ज्यांनी त्यांच्या सिनेमामधील चांगल्या कामाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. नुकत्याच एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रहमान म्हणाले: "मी चांगल्या चित्रपटांना नाकारत नाही, परंतु मला असे वाटते की अशी एक टोळी आहे, जी गैरसमजांमुळे काही चुकीच्या अफवा पसरवित आहे."


Last Updated : Jan 9, 2023, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details