ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

AR. Rahman : सर्जन्स असोसिएशननं एआर रहमान यांच्यावर केला 'हा' आरोप.... - एआर रहमान

A. R. Rahman : लोकप्रिय गायक आणि संगीतकार एआर रहमान यांच्यावर सर्जन्स असोसिएशननं आरोप केला आहे. हा आरोप आता रहमान यांनी फेटाळून लावला आहे.

AR. Rahman
एआर रहमान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 7:14 PM IST

मुंबई - A. R. Rahman :लोकप्रिय गायक आणि संगीतकार एआर रहमान यांनी आपल्या दमदार संगीतानं लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एआर रहमान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आता रहमान हे सध्या चर्चेत आला आहे. रहमान यांच्याबाबत सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. रहमान यांनी असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाला (एएसआयकॉन) 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रहमान यांनी सर्जन्स असोसिएशनवर प्रतिष्ठा बदनाम केल्याचा आरोप केला आहे. एआर रहमान यांनी बदनामीसाठी असोसिएशनकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

सर्जन असोसिएशननं एआर रहमान यांच्यावर केला 'हा' आरोप : सर्जन्स असोसिएशनने एआर रहमान यांच्यावर आरोप केला आहे की, ते 2018 मध्ये असोसिएशनच्या 78 व्या वार्षिक परिषदेत कार्यक्रम करणार होते, परंतु ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. याशिवाय, कार्यक्रमाला उपस्थित नसतानाही, एआर रहमान यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी घेतलेले 29.5 लाख रुपये असोसिएशनला परत केले नसल्याचे आरोप केला आहे.

एआर रहमानचे वकील नर्मदा यांनी केला खुलासा : एआर रहमान यांचे वकील नर्मदा संपत यांनी असोसिएशनचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात एआर रहमान यांनी असोसिएशनशी कधीही कोणताही करार केला नसल्याचे सांगितले जात आहे. रहमान यांच्या वकिलाने खुलासा करत सांगितले की, प्रसिद्धीसाठी एआर रहमान यांच्या सन्मानाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. नर्मदा यांनी दावा केला की ए.आर. रहमान यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी असोसिएशनने अॅडव्हान्स बुकिंगचे पैसे दिले नाहीत. रहमान यांची प्रतिष्ठा बदनाम करण्याचा हेतू सर्जन असोसिएशनचा आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. सर्जन्स असोसिएशनने जाहीर माफी रहमान यांना मागावी अशी मागणी नर्मदा संपत यांनी केली आहे. याशिवाय एआर रहमान यांना 15 दिवसांच्या आत नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये देण्यासही सांगितले आहे.

एआर रहमान यांनी आरोप फेटाळून लावले :दुसरीकडे, या प्रकरणी एआर रहमान यांनी म्हटले, मला कोणतेही पैसे कधीच दिले गेले नाहीत, तर हे पैसे 'सेंथिलवेलन आणि सेंथिलवेलन' या थर्ड पार्टी कंपन्यांच्या समूहाला दिल्या गेले आहे. असोसिएशनने माझ्याशी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही, तरीही ते मला या वादात ओढत आहे. एआर रहमानच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

  1. Country of blind teaser out : हिना खान स्टारर 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा टीझर झाला प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  2. Gayatri Joshi Car Accident: इटलीमध्ये स्वदेश फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा झाला कार अपघात
  3. Fighter : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचे सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल; पहा फोटो...

ABOUT THE AUTHOR

...view details