महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंदुरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी एआर रहमान ऑटो-रिक्षानं पोहोचले नागोर दर्ग्यात - एआर रहमान कंदुरी महोत्सव झाले सहभागी

AR Rahman reaches Nagore Dargah: कंदुरी उत्सवात सहभागी होण्यासाठी एआर रहमान ऑटो-रिक्षानं नागोर दर्ग्यात पोहोचले होते. या दर्ग्यातील त्यांची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

AR Rahman reaches Nagore Dargah
एआर रहमान नागोरे दर्ग्यामध्ये पोहोचले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 4:30 PM IST

मुंबई : AR Rahman reaches Nagore Dargah : कंदुरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संगीतकार एआर रहमान यांनी नागापट्टिनम येथील नागोर दर्गाला भेट दिली. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते ऑटो-रिक्षाने पोहोचले होते. त्यांनी यावेळी मरून कुर्ता परिधान केला होता. कंदुरी महोत्सव 14 दिवसांचा असतो. या महोत्सवाला नागोर दर्गाह उत्सव म्हणूनही ओळखले जाते. जामथुल अगीर या इस्लामिक महिन्यात संत शाहुल हमीद यांच्या पुण्यतिथीच्या पहिल्या ते चौदाव्या दिवसापर्यंत हा महोत्सव साजरा केला जातो. संत हजरत सय्यद शाहुल हमीद हे सुफी संतांचे 13व्या पिढीतील वंशज होते. 16 व्या शतकातील तंजावरचा हिंदू राजा अच्युतप्पा नायक याच्या शारीरिक आजारावर उपचार केल्यानंतर त्यांना एक ओळख मिळाली. कंदुरी उत्सवाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे.

कंदुरी महोत्सवाचं महत्व : कंदुरी उत्सव हा ध्वज फडकावून साजरा केला जातो. हा ध्वज नंतर रथांद्वारे नागोर दर्ग्यात नेतात. दुसऱ्या ते सातव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या दुआंसह कुराण वाचली जातात. कंदुरी महोत्सवात फटाक्यांची आतषबाजी होते. ही आतषबाजी उत्सवाचे वातावरण वाढवणे आणि सत्य असत्याला कसे पळवून लावते यासाठी केली जाते. दरम्यान संगीत दिग्गज ए.आर. रहमानबद्दल बोलताना, ते अबू धाबी येथे यूएई ( UAE) च्या 52 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 'सॉन्ग ऑफ होप' चं अनावरण केलं. या विशेष प्रसंगी, एआर रहमान यांनी अबू धाबी येथे यूएईचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांना श्रद्धांजली वाहिली.

'सिंगिंग फॉर द चिल्ड्रेन ऑफ झायेद' कार्यक्रम : रेहमाननं यांनी एका कार्यक्रमात भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील आणि अबू धाबी येथील बुर्जील होल्डिंग्स यांच्यातील सहयोगी प्रयत्नातून त्याच्या आगामी गाण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात बोलताना रहमान यांनी म्हटलं, 'निस्वार्थपणे काम करणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी हे गाणे आहे. जगाला आज आशेची गरज आहे. मला आशा आहे की हे गाणे शांती, समज आणि आनंद देईल''.

हेही वाचा :

  1. मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रमात 'या' कलाकारांनी लावली हजेरी
  2. प्रभास स्टारर 'सालार' बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकूळ
  3. उमंग 2023: मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जबरदस्त एंट्री, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details