महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aquaman 2 vs Dunky : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस आधीच रिलीज होणार 'अ‍ॅक्वामन 2'

Aquaman 2 vs Dunky : हॉलिवूड चित्रपट 'एक्वामॅन 2' च्या निर्मात्यांनी शाहरुख खानच्या बॅक टू बॅक हिट चित्रपटांनंतर त्यांच्या 'एक्वामॅन 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. 22 डिसेंबर रोजी 'डंकी' आणि 'एक्वामन 2' भारतात प्रदर्शित होणार होते.

Aquaman 2 vs Dunky
एक्वामॅन 2ची रिलीज तारीख बदलली

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 5:50 PM IST

मुंबई - Aquaman 2 vs Dunky: शाहरुख खान 2023 मध्ये सलग तिसरासुपरहिट चित्रपट देण्यासाठी सज्ज झालाय. या आधी जानेवारीत रिलीज झालेला 'पठाण' आणि सप्टेंबरमध्ये गाजलेल्या 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. तो पुन्हा एकदा हिटची हॅट्रीक साधणार असं बोललं जातंय. त्याचा आगामी 'डंकी' चित्रपट ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी DC कॉमिक्सचा 'एक्वामॅन 2' ( Aquaman and the Lost Kingdom ) हा चित्रपटा भारतात प्रदर्शित होत होता. पण शाहरुख खानचे बॅक टू बॅक हिट्स पाहिल्यानंतर 'एक्वामॅन 2' च्या निर्मात्यांनी भारतात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.

'एक्वामॅन 2' ' कधी प्रदर्शित होणार? - 'एक्वामॅन 2' हा चित्रपट 220.5 कोटी डॉलर्सच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट जेम्स वॉनने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने आधीच जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि आता निर्माते याच्या सीक्वेलसह बॉक्स ऑफिसवर धमाल करण्याचा विचार करत आहेत. 'एक्वामॅन 2' आधी 22 डिसेंबरला भारतात रिलीज होणार होता आणि आता हा सिनेमा एक दिवस आधी 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. म्हणजेच एक्वामनच्या चाहत्यांना 'डंकी' रिलीजच्या एक दिवस आधी हा चित्रपट पाहता येणार आहे. हॉलिवूड स्टार जॉनी डेपची माजी पत्नी अंबर हर्ड एक्वामन 2 च्या मुख्य स्टारकास्टमध्ये आहे. तर जेसन मोमोआ एक्वामनच्या भूमिकेत दिसणार आहे. इतर कलाकारांमध्ये पॅट्रिक विल्सन, बेन ऍफ्लेक, अभिनेत्री निकोल किडमन आणि याह्या अब्दुल-मतीन II यांचा समावेश असेल.

'डंकी' चित्रपटाबद्दल: शाहरुख खान, विकी कौशल आणि तापसी पन्नू स्टारर चित्रपट 'डंकी' 21 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात आणि 22 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात 'एक्वामॅन 2' आणि 'डंकी' यांच्यातील लढत होणार आहे. 'डंकी' चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलंय. यामध्ये शाहरुख खान अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details