मुंबई - Anushka Sharma viral video : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहे. तिनं किंवा तिचा पती विराट कोहलीने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तरीही तमाम चाहत्यांना जवळजवळ खात्री पटली आहे कारण तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बंगळूरूतील या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीसह दिसत असून यात तिचा बेबी बंपही दिसतोय.
सध्या ही जोडी बंगळूरूमध्ये आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला पाहून अनुष्काचं चालणं 'प्रेग्नंन्सी वॉक' असल्याचा तर्क चाहत्यांनी लावलाय. व्हिडीओमध्ये अनुष्का चमकदार दिसतेय, तिनं मोठे स्लीव्हज असलेला सैल काळा ड्रेस परिधान केला आहे. दरम्यान, विराट कोहली करड्या रंगाचा टी-शर्ट आणि बेज पँट घातलेला दिसतोय.
काही आठवड्यांपूर्वी फोटोग्राफर्सनी या जोडप्याला मुंबईतील एका प्रसूती क्लिनिकबाहेर पाहिलं होतं. असंही सांगितलं जातंय की, या जोडप्याने पापाराझींना त्यांचे फोटो तेथे न घेण्याची विनंती केली आणि योग्य वेळी अधिकृत घोषणा करण्याचं वचन दिलं. अनुष्का आणि विराट त्यांच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच विवेकी राहिले आहेत.
2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान या जोडप्यानं पहिल्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्या प्रमाणेच ते दुसऱ्याही मुलाची गोड बातमी देतील अशी प्रतीक्षा चाहते करत आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे.