मुंबई - परवानगीशिवाय तिचे फोटो वापरल्याबद्दल अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी अॅथलीझर ब्रँडवर टीका केली आहे. इंस्टाग्राम स्टोरी वर अनुष्काने अॅथलीझर ब्रँड, प्यूमाची निंदा करताना कॅप्शनसह स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. काही तासांनंतर, अभिनेत्री आणि ब्रँडने एकत्र येऊन अधिकृतपणे जाहीर केले की तिने टाकलेली इन्स्टा स्टोरी पोस्ट ही फसवी होती व तो एक प्रमोशनचाच भाग होता. यापूर्वी, अनुष्काने तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो वापरल्याबद्दल ब्रँडची निंदा केली होती. त्यांच्या सीझनच्या शेवटच्या विक्रीचा प्रचार करत त्यांनी अनुष्काचे फोटो वापरले होते. आता असे दिसून आले आहे की प्यूमा इंडियाच्या नवीन सोशल मीडिया पोस्टवर अभिनेत्री लवकरच स्पोर्ट्सवेअरसाठी साईन करणार आहे.
अनुष्का शर्माने अॅथलीझर ब्रँडसाठी केला पब्लिसिटी स्टंट
सोमवारी, अनुष्का शर्माने तिच्या परवानगीशिवाय फोटो वापरल्याबद्दल प्यूमाला फटकारले. पण नंतर स्पष्ट झाले की हादेखील एक प्रमोशनचाच भाग होता आणि अनुष्का यापुढे या ब्रॅँडची अधिकृत जाहीरात करणार आहे.
विशेष म्हणजे, अनुष्काचा नवरा विराट कोहली हा प्यूमाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि त्याचप्रमाणे करीना कपूर खान देखील त्यांच्या उत्पादनांची सोशल मीडियावर जाहिरात करते. आता अनुष्का करीनाच्या जागी ब्रँड अॅम्बेसेडर बनवते की बेबो आणि विराटला प्यूमाचा चेहरा बनवते हे पाहणे मनोरंजक असेल. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अनुष्काने अलीकडेच कालामधील तिच्या कॅमिओने सर्वांना आश्चर्यचकित केले. चित्रपटातील तिची उपस्थिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती आणि असे दिसते की ते रिलीजनंतर खूप चर्चेचे ठिकाण बनले आहे.
अनुष्काचा भाऊ, कर्णेश शर्माच्या प्रॉडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्झच्या या चित्रपटात तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी आणि बाबिल खान यांच्या भूमिका आहेत. हे बाबिलचे चित्रपटांमध्ये अधिकृत पदार्पण आहे.आगामी काही महिन्यांत, अनुष्का बहुचर्चित 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटात प्रतिष्ठित भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.