मुंबई - Anushka sharma and virat kohli :भारत-न्यूझीलंड सामन्यात भारतानं चांगली कामगिरी करत शानदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यामध्ये विराट कोहलीनं 95 धावांची जबरदस्त खेळी खेळली. हिमाचलच्या धर्मशाला येथे 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा ही पती विराटला चेअर करण्यासाठी उपस्थित नव्हती. दरम्यान आता अनुष्का शर्मानं एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहलं , 'तुझा नेहमीच अभिमान वाटतो'. त्यानंतर दुसऱ्या एका फोटोत तिनं लिहलं, 'स्टॉर्म चेजर'. अनुष्का ही विराटला नेहमी चेअर करताना स्टेडिअमवर दिसते. भारत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान अनुष्का ही विराटला चीअर करण्यास पोहचली होती. यावेळी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
विश्वचषक 2023मध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला : भारतानं विश्वचषक 2023 मधील आपल्या पाचव्या सामन्यातही शानदार विजय नोंदवला आहे. 20 वर्षांनंतर विश्वचषकात भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारताच्या शानदार विजयात मोहम्मद शमीसोबत विराट कोहलीचाही महत्त्वाचा वाटा होता. शमीनं 5 बळी घेतले, तर विराट 95 धावा करून बाद झाला. विराटचे वनडेतील 49 वे शतक हुकले. धर्मशाला येथे हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा होता. आता सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते म्हणत आहे की, जर अनुष्का शर्मा यावेळी उपस्थित असती तर, या सामन्यात विराट त्यांच शतक पूर्ण करू शकला असता.