महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खाननं वाचवलं होतं अनुष्का-विराटचं नातं ; जाणून घ्या या मागची कहाणी - सलमान खान

Anushka Sharma Virat Kohli Wedding Anniversary : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली आज 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 6वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी या जोडप्याविषयी आपण काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत.

Anushka Sharma Virat Kohli Wedding Anniversary
अनुष्का शर्मा विराट कोहलीच्या लग्नाचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 11:53 AM IST

मुंबई - Anushka Sharma Virat Kohli Wedding Anniversary : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी झालं. या जोडप्यानं कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत इटलीमध्ये सात फेरे घेतले. दरम्यान आज त्याच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते. आज दोघेही चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. विराट कोहली अनेकदा अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. हे जोडपे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकहाणी :विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका शॅम्पू ब्रँडच्या शूटिंगदरम्यान झाली होती. अनुष्का शर्माला भेटण्यापूर्वीच विराट कोहली तिचा चाहता होता. विराटनं त्याच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा तो पहिल्यांदा अनुष्का शर्माला भेटला तेव्हा तो खूप घाबरला होता. अनुष्कासोबत अ‍ॅड शूट दरम्यान विराटनं अनुष्काच्या उंची आणि तिच्या टाचांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर अनुष्काला राग आला होता, मात्र विराटनं लगेच माफी मागतली होती. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांना प्रेमकहाणी सुरू झाली. 2014 मध्ये विराट कोहलीचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये पोहोचली, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरल्या होत्या.

सलमान खानने अनुष्का-विराटचे नाते वाचवले का? : विराट आणि अनुष्काच्या लग्नापूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. जेव्हा अनुष्का आणि विराटच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर पकडला तेव्हा, अनुष्का शर्मा सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटाचे शूटिंग करत होती. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खाननं दोघांनाही आपल्या घरी बोलावून समजविलं होतं. त्यानंतर त्याचं पॅचअप झालं. दरम्यान अनुष्का आणि विराट त्याच्या सुखी संसारात खूप आनंदी आहे. हे जोडप्यानं 2021 मध्ये पालक झाले. या दोघांना वामिका नावाची मुलगी आहे. याशिवाय आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'जलसा'बाहेर जमलेल्या चाहत्यांना अमिताभ बच्चन यांनी नातू अगस्त्य नंदासोबत केले अभिवादन
  2. 'टायगर-3'च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो व्हायरल
  3. परिणीती चोप्रा राजकारणात होणार का सामील? म्हणाली

ABOUT THE AUTHOR

...view details