मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते शतकानुशतके जुने आहे. आता अशी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावरून असे दिसून येते की जोड्या खरोखरच वरून ठरल्या असतात आणि जे तुमच्या नशिबात लिहिले आहे ते कोणीही तुमच्या पासून हिरावून घेऊ शकत नाही हे खरे आहे. खरं तर, आयपीएल16 संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोन दिग्गज स्टार क्रिकेटर्सच्या बायका या बालपणीच्या मैत्रिणी आहे. अनुष्का शर्मा आणि साक्षी या एकाच शाळेत शिकल्या आहे. अनुष्का आणि साक्षीचे बालपणीचे शालेय दिवसातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी या फोटो निरीक्षण केले त्यानंतर या फोटोबद्दलची एक विशेष माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार असे माहित झाले आहे की, या दिग्गज स्टार क्रिकेटर्सच्या बायका या सोबत शाळेत शिकल्या आहे.
अनुष्का आणि साक्षी बालपणीच्या मैत्रिणी : अनुष्का शर्माचे वडील भारतीय दलातील सेवानिवृत्त कर्नल आहेत. अनुष्का लहान असताना त्यांची नियुक्ती आसाममध्ये झाली होती. इथेच अनुष्का आणि साक्षी एकाच शाळेत एकत्र शिकत होत्या. साक्षी आधीपासूनच इथे शिकायची आणि अनुष्काला नंतर याठिकाणी प्रवेश मिळाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्काने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तर साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. यानंतर तिने हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. या हॉटेलमध्ये धोनी हा साक्षीला भेटाला होता. आणि येथूनच धोनीची प्रेमकहाणी सुरू झाली. पहिल्यांदा धोनीने साक्षीला पाहिल्यानंतर आपले हृदय हरवून बसला.