मुंबई - IFFI 2023: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितनं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. माधुरी दीक्षितनं अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. माधुरीनं प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयानं तिच्या प्रत्येक पात्रात जीव आणला आहे. माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्रीशिवाय अप्रतिम नृत्यांगना देखील आहे. आता धक धक गर्ल चर्चेत आली आहे. माधुरीला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित देण्यात येणार आहे
माधुरी दीक्षितला या विशेष पुरस्कारानं सन्मानित केले : '54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये माधुरी दीक्षितला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे की, ते माधुरीचा विशेष गौरव करणार आहे. 'माधुरी दीक्षितनं 4 दशकांपासून तिच्या प्रतिभेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. माधुरीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. माधुरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपले सुंदर सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.