मुंबई - Animal game changer for Hindi : 'अॅनिमल' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं असलं तरी याचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यावर काही जणांनी खरपूस टीकाही केली होती. मात्र फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्या कामाचं भरपूर कौतुकही केलं. एसएस राजामौली, राम गोपाल वर्मा, करण जोहर यांच्यासह इंडस्ट्रीतील वरिष्ठांकडून त्याला पाठिंबा मिळाला होता. आता त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्यांमध्ये अनुराग कश्यपही सामील झाला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांच्या एका विभागाकडून अॅनिमलला टीकेला सामोरे जावे लागत असल्याने, अनुराग कश्यपने सांगितले की, संदीपला निर्माता म्हणून टीकाकार समजून घेऊ शकलेले नाहीत.
सोशल मीडियावर अनुराग कश्यपने संदीपसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की संदीपला न्यायासाठी खूप संघर्ष करावा लागला असला तरी त्याला तो उत्तम माणूस समजतो. अनुरागने असेही नमूद केले की दोनदा 'अॅनिमल' पाहिल्यानंतर त्याला संदीपला भेटायचे होते आणि त्याच्यासाठी काही प्रश्न होते, त्याची संदीपने संयमाने उत्तर दिले.
"संदीप रेड्डी वंगासोबत खूप छान संध्याकाळ घालवली. या क्षणी तो एक सर्वात गैरसमज झालेला, जज केला जाणारा आणि टीका झालेला चित्रपट निर्माता आहे. माझ्यासाठी, तो सर्वात प्रामाणिक, असुरक्षित आणि एक सुंदर माणूस आहे. खरंतर त्याच्या चित्रपटाबद्दल कोण काय म्हणतंय, याने मला काहीच फरक पडत नाही. हा चित्रपट मी दोनदा पाहिला आहे. मला त्याला माणसाला भेटायचे होते आणि मला काही प्रश्न होते, आणि मी त्याच्या चित्रपटाबद्दल जे काही विचारले त्या प्रत्येक गोष्टीची त्याने उत्तरे दिली. तू जसा आहेस त्याबद्दल आणि संयम बाळगल्याबद्दल तुझे आभार.", असे अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर म्हटलं आहे.