महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनराग कश्यपचा ५० वा वाढदिवस, मुलगी आलिया कश्यपने दिल्या शुभेच्छा!! - अनुरागची मुलगी आलिया

अनुराग कश्यपचा ( Anurag Kashyap ) आज ५० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांची अमेरिकेत राहणारी मुलगी आलिया कश्यप ( Aaliyah Kashyap ) हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर वडिलांसोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि त्यांना त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलिया ही अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजच्या ( Aarti Bajaj ) पोटी जन्मली आहे.

आलिया कश्यपचा वडीलांसोबतचा फोटो
आलिया कश्यपचा वडीलांसोबतचा फोटो

By

Published : Sep 10, 2022, 12:27 PM IST

Updated : Sep 10, 2022, 12:54 PM IST

मुंबई- दिग्गज चित्रपट निर्माता अनुराग कश्यप ( filmmaker Anurag Kashyap ) आज 50 वर्षांचा झाला आहे. चित्रपट निर्मात्याला त्याच्या 50 व्या वाढदिवशी खूप शुभेच्छा मिळाल्या असतील, परंतु त्याची मुलगी आलिया कश्यपच्या ( Aaliyah Kashyap ) वाढदिवसाच्या शुभेच्छाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुरागची मुलगी आलिया सध्या यूएसमध्ये आहे. आलिया कश्यप ( Aaliyah Kashyap ) हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर वडिलांसोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि त्यांना त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्टार किडने तिच्या वडिलांसोबत स्वतःच्या बालपणीचे फोटो शेअर केला. थ्रोबॅक पिक्चरमध्ये तिच्या वडिलांसोबतचे हे आवडते क्षण शेअर करताना आलियाने लिहिले, "शानदार वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. बिग 50!!!"

आलिया कश्यपचा वडीलांसोबतचा बालपणीचा फोटो

आलिया कश्यप ही तिच्या वडिलांप्रमाणेच प्रतिभावान आहे आणि जीवनशैली, फॅशन आणि सौंदर्य याबद्दल एक यूट्यूब ( YouTube ) चॅनेल चालवते. तिचे 119K पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि ती वारंवार तिच्या फॉलोअर्सही उत्तम सामुग्री शेअ करत असते.

आलिया ही अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजच्या ( Aarti Bajaj ) पोटी जन्मली आहे. आरती आणि अनुराग यांनी जवळपास 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर 1997 मध्ये लग्न केले आणि 2009 मध्ये घटस्फोट घेतला. या जोडप्याने 2001 मध्ये आलियाचे स्वागत केले होते.

वर्क फ्रंटवर अनुरागच्या नुकत्याच 19 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'दोबारा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा -The Lion King Prequel लायन किंग प्रीक्वल मुफासा: द लायन किंगची डिस्नेकडून घोषणा, प्रतीक्षा रिलीज तारखेची

Last Updated : Sep 10, 2022, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details