मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आता कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 साठी फ्रान्समध्ये आहे, जिथे त्याच्या नवीन चित्रपट 'केनेडी' या चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शकाने सांगितले की,त्यांनी या चित्रपटासाठी अभिनेता चियान विक्रमला साइन करायचे होते. मात्र, विक्रमने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी राहुल भट्टला कास्ट केले. या चित्रपटाचे नाव हे विक्रम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या तमिल स्टारचे एक नाव केनी देखील आहे.
अनुराग कश्यप मुलाखत : अनुराग कश्यपच्या मुलाखतीची क्लिप ऑनलाइन पोस्ट होताच, विक्रमने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये अनुराग टॅग करत लिहले, चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा, सोशल मीडियावरील आमचे मित्र आणि हितचिंतक, 'मी माझा एक वर्षापूर्वीच्या आमच्या संभाषणाची उजळणी करत आहे. मी तुम्हाला लगेच कॉल केला आणि स्पष्ट केले की मला तुमच्याकडून कोणताही मेल किंवा संदेश प्राप्त झाला नाही. तुम्ही ज्या मेल आयडीवर माझ्याशी संपर्क साधला होता तो आता अॅक्टिव्ह नाही आणि माझा नंबर त्याआधी जवळपास दोन वर्षांपूर्वी बदलला होता,' असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये पुढे असे लिहिले, 'मी दुसऱ्या एका अभिनेत्याकडून ऐकले होते की या चित्रपटासाठी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा फार प्रयत्न केला होता आणि तुम्हाला वाटले की मी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही, म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला. मी तुमच्या केनेडी चित्रपटासाठी माझी उत्सुकता व्यक्त केली. मला आशा आहे की तुमचे भविष्य समृद्ध असेल. तुम्हाला खूप प्रेम. चियान विक्रम उर्फ केनेडी.