हैदराबाद : 1 मार्च रोजी प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. परदेशातही या चित्रपटाची चर्चा होत आहे. त्याचवेळी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी शेयर केलेला व्हिडीयो सोशल मिडीयावर जबरदस्त चर्चेत आहे. यात काही पंडित अनुपम खेर यांची पूजा करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये दोन पंडित मंत्रोच्चार करत आहेत आणि अनुपम खेर यांना फुलांचा हार घालताना दिसत आहेत. अनुपम खेर यांची देवासारखी पूजा केली जात आहे. या चित्रपटात अनुपम यांनी काश्मिरी पंडित पुष्करनाथ पंडित यांची भूमिका साकारली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून किंवा #TheKashmirFiles रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी एक पंडित किंवा पुजारी माझ्या घराखाली येतो. आणि पूजा करतो आणि काहीही न मागता निघून जातो, असेही सांगितले आहे.