मुंबई: चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. 'केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, असे काही लोक आहे जे नेहमी चांगल्या चित्रपटाचा विरोध करतात. सर्वत्र विनाकारण विरोध करत राहतात. मग ते CAA आंदोलन, शाहीनबाग आंदोलन वा जेएनयू आंदोलन असो, अशा गोष्टीं विरोधात आंदोलन करतात. आता याचं लोकांनी 'द काश्मीर फाइल्स'ला विरोध केला होता. खेर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, मला या व्यक्तींचा हेतू माहित नाही आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
अनुपम खेर यांची मुलाखत :'द केरळ स्टोरी'च्या घडामोडीबाबत ते म्हणाले की, मी चित्रपट हा चित्रपट पाहिला नाही, पण मला याचा आनंद आहे की असे चित्रपट बनविले जात आहे. ते पुढे म्हणाले की, काहींना असे वाटते की हा एक प्रोपोगंडा आहे. कोणाला कुठल्याही विषयावर चित्रपट बनवण्यास ते मोकळे आहेत, ज्यांना जे योग्य वाटते त्या विषयावर ते चित्रपट बनवू शकतात आणि याला कुठलाही प्रतिबंधही नाही.अनुपम खेर हे सध्याला त्य़ांच्या आगामी चित्रपट 'आईबी71'च्या प्रोमोशनमध्ये गुंतले आहेत. 'आईबी71' हा चित्रपट हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरणारा आहे. 'आईबी71' हा चित्रपट काही अज्ञात नायकांबद्दल आहे ज्याचे नाव फार कमी वेळा घेतले जाते. 1971 च्या युद्धला 50 वर्ष जवळपास पूर्ण झाली, मात्र या नायकाबद्दल कोणाला फार माहिती नाही.