मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सध्या चर्चेत आले आहेत. अनुपम खेर लागोपाठ अनेक चित्रपटाची घोषणा करत आहेत. अलीकडेच, त्यांनी महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित त्याच्या ५३८व्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी १३ जुलै रोजी एका चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटासंबंधित एक फोटो शेअर केला आहे.
अनुपम खेर केली घोषणा : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ५३९ व्या चित्रपटाची घोषणा करताना शेअर केलेला फोटोमध्ये असे दिसत आहे, ते त्यांच्या आगामी चित्रपटात खलनायकच्या भूमिकेत असू शकतात. कारण फोटोमध्ये खेर हे फार भयानक दिसत आहेत. याशिवाय अनिल कपूर स्टारर 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील खलनायक अमरीश पुरी, मोगँबोची व्यक्तिरेखाही आता गायब आहे. त्यामुळे या फोटोद्वारे कुठे ना कुठे अमरीश पुरीची देखील व्यक्तिरेखा इथे आठवते. फोटोमध्ये खेर हे त्यांच्या साम्राज्याच्या सिंहासनावर बसलेले दिसत आहेत. त्यांनी हातात त्रिशूलसारखे एक शस्त्र घेतलेले आहे. याशिवाय त्यांच्या सिंहासनाभोवती साप गुंडाळलेले आहेत. त्यामुळे असे दिसून येत आहे की, त्यांचा हा आगामी चित्रपट फार मनोरंक असेल. या चित्रपटाद्वारे ते अनोख्या भूमिकेत रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, 'माझा ५३९ वा चित्रपट हा पौराणिक कथा किंवा कोणत्याही मोठ्या कथेवर आधारित नाही, तर हा भारतातील सर्वात मोठा बहुभाषिक कल्पनारम्य चित्रपट आहे. या चित्रपटाचा विषय हा फार चांगला आहे. निर्माते हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करतील. यादरम्यान तुम्ही माझा लूक पाहून चित्रपटाचा अंदाज लावू शकता, जय हो', असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले.