महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Actor Chalapathy Rao passed away : लोकप्रिय अभिनेते चलपथी राव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - actor Chalapathy Rao passed away

लोकप्रिय अभिनेते चलपथी राव (78 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (heart attack) झाले. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चलपती राव यांच्या आकस्मिक निधनाने टॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा (Another tragedy in Tollywood) पसरली आहे. चलपथी राव यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. (Actor Chalapathy Rao passed away)

Chalapathy Rao
अभिनेते चलपथी राव

By

Published : Dec 25, 2022, 9:54 AM IST

हैदराबाद :टॉलिवूडमध्ये आणखी एक शोकांतिका (Another tragedy in Tollywood) घडली. लोकप्रिय अभिनेते चलपथी राव (78 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (heart attack) झाले. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चलपथी राव यांचा जन्म 8 मे 1944 रोजी कृष्णा जिल्ह्यातील बल्लीपररू येथे झाला. (Actor Chalapathy Rao passed away)

600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले :लोकप्रिय अभिनेते चलपथी राव यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. आता चलपती राव यांच्या आकस्मिक निधनाने टॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चलपथी राव यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा रवी बाबू दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे.

गुडाचरी 116 या तेलगू चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण : चलपथी राव एक अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखले जातात. 1966 मध्ये 'गुडाचरी 116' या तेलगू चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चलपती राव यांनी कलियुग कृष्णाडू, कडपा रेडम्मा, जगन्नाटकम, पेलांटे नुरेला पंता, राष्ट्रपती गारी अल्लुडू आणि निर्माता म्हणून काम केले.

ABOUT THE AUTHOR

...view details