मुंबई - Ankita Lokhande Trolled :'बिग बॉस 17'मध्ये सेलेब्समध्ये रोज नवे वाद होताना दिसताहेत. या शोमध्ये अंकिता लोखंडे अनेकदा सुशांतबद्दलच्या आठवणी सांगताना दिसते. अंकिता जेव्हाही सुशांतबद्दल बोलते, तेव्हा ती भावूक होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेक कुमारशी बोलताना अंकिता भावूक झाली. त्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. मात्र काहीजण आता तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. अंकिता या शोमध्ये अभिषेकशी सुशांतबद्दल बोलताना म्हणते की, 'जेव्हा तू शर्टशिवाय घरात फिरतो, तेव्हा तू मला सुशांतची आठवण करून देतो'. त्यानंतर यावर अभिषेक सांगतो की, 'माझा आणि सुशांतचा प्रवास सारखाच आहे. आम्ही दोघेही लहान शहरातील आहोत'. त्यानंतर अंकिता म्हणते की, 'सुशांत अजिबात आक्रमक नव्हता. तो खूप शांत होता'.
अंकिता भावूक झाली : सुशांतबद्दल बोलताना अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती सांगते की 'तो नेहमी सर्वांशी चांगला वागला आणि प्रत्येकाला तो मदत करत होता, त्यानंतर अचानक तो दुःखी झाला'. सुशांतचं कौतुक करताना अंकितानं म्हटलं, 'तो खूप मेहनती होता.' त्यानंतर ती भावूक झाल्याचं पाहून अभिषेक म्हणतो की, 'त्याला वाटले की तो कधीच तिच्याशी सुशांतबद्दल बोलणार नाही'. यावर अंकिता म्हणते की, 'तिला सुशांतबद्दल बोलायला आवडते.' अंकिता आणि अभिषेकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली. काहीजणांनी तिला नाटक करत असल्याचं म्हटलंय.