मुंबई - bigg boss 17 :अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कपल आता 'बिग बॉस'च्या घराचा भाग झालंय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये हे कपल रोमँटिक क्षण घालवताना दिसतंय. हे जोडपं जेव्हा 'बिग बॉस'मध्ये आलं होतं तेव्हा, चाहत्यांना वाटू लागलं की शोमध्ये त्यांची रोमँटिक बाजू पाहायला मिळेल. मात्र त्यांच्यात सतत भांडणं होत होती. अनेकदा विकी अंकितावर रागावलेला दिसत होता, त्यानंतर ती कुठल्यातरी कोपऱ्यात रडताना दिसत होती. अंकिता आणि विकीच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत, पण तरीही दोघंही एकत्र राहत नाहीत. अंकितानं यामागचं कारण सांगितलं आहे.
अंकिता लोखंडेने केला खुलासा : 'बिग बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी एका मुलाखतीत अंकिता लोखंडेनं ती 'बिग बॉस'च्या घरात का जात आहे, याचा खुलासा केला होता. तिनं सांगितलं होतं की, जर मी विकीबरोबर जात असेन तर, तो माझा आधार आणि ताकद असेल. त्यानंतर तिनं पुढं सांगितलं की, विकी आणि मी एकत्र राहत नाही. हा प्रवास मी ४ महिन्यांचा मानत आहे. ही आमच्यासाठी एकत्र आनंद घेण्याची संधी आहे. आम्ही एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते, विकी त्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने बिलासपूरला राहतो. तो दोन्ही शहरांत फिरत राहतो. आमच्या हनिमूनच्या वेळी 20 दिवसांपेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. म्हणूनच मला एकत्र राहण्याची ही चांगली संधी वाटली.