मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्रामवर संक्रांत सणाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये सैराटमधील याड लागलं या लोकप्रिय गाण्यावर तिने सुंदर रील बनवले आहे. यामध्ये तिचा पती विकी जैन तिला प्रेमाने आलिंगन देत असून तिची शाही बडदास्त ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.
अंकिता लोखंडेची रोमँटिक संक्रात यासोबतच अंकिताने पती विकीसोबतचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने नऊवारी साडी नेसली असून काळ्या रंगाच्या या भरजरी नक्षीदार साडीत अंकिताचे रुप खूपच देखणे दिसत आहे. लाल रंगाच्या नक्षीदार सोफ्यावर ती विकीच्या मांडीवर बसून फोटोला पोज देताना दिसत आहे.
अंकिता लोखंडेची रोमँटिक संक्रात दुसरा फोटो पलंगावरचा असून यात रोमँटिक जोडपे एकमेकांच्या हास्यात हास्य मिळवताना दिसत आहे. यात तो तिच्या पैंजणाशी खेळताना दिसत आहे.
अंकिता लोखंडेची रोमँटिक संक्रात पुढच्या फोटोत त्याने अंकीताचा हात पकडला असून चुडा भरलेली अंकिता लाजून चूर झालेली दिसते.
अंकिता लोखंडेची रोमँटिक संक्रात पुढच्या फोटोत एकमेकांच्या गालाशी गाल लावत विकी आणि अंकिता रोमँटिक झालेले दिसत आहेत. सर्व फोटोमध्ये हे सुखी जोडपे संसाराचा आनंद पुरेपूर घेताना दिसत आहेत.
अंकिता लोखंडेची रोमँटिक संक्रात अंकिता लोखंडेने मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची साडी नेसली होती. या फोटोंमध्ये ती पारंपरिक मराठी लूकमध्ये दिसत आहे. तिच्याकडे पाहताना मकर संक्रातीचा मराठमोळा लुक एकदम जुळून आल्याचे दिसते. तिच्या या फोटोवर अंकिताचे चाहते फिदा झाले आहेत. अत्यंत वेगाने तिला कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांनी केला आणि या जबरदस्त साडी लुकने तिने सगळ्यांचे मने जिंकली आहेत.
या फोटोसोबत अंकिताने आणखी एक व्हिडिओ संक्रांतीच्या निमित्ताने पोस्ट केला आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटातील श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी गायलेल्या पोरी पिंगा गं या गाण्यावर तिने रीळ बनवले आहे.
यात ती आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. अंकिता आणि विकी व्हिडिओमध्ये अत्तरदाणी मधून सुवासिक पाणी शिंपण करताना दिसतात. नंतर ती घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वादही घेते. अत्यंत मराठमोळ्या पध्दतीने अंकिताने संक्रांतीचा सण साजरा केल्याचे व्हिडिओत दिसते.
विकी जैनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने काळ्या रंगाचा कुर्तापायजमा आणि हिरव्या रंगाचा वेस्टकोट परिधान केला होता आणि जो त्याला खूप खुलून दिसत होता. अंकिता आणि विकीची जोडी या फोटो सेशनमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
हेही वाचा -Pathaan Ott Release: शाहरुखच्या पठाण चित्रपटाची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली