मुंबई - Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' हा शो प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करत आहे. या शोमध्ये नेहमीच जेवणावरून भांडणं होत असतात. मागच्या भागातही असंच काहीसं घडलं होतं. 'बिग बॉस'चा नियम असा आहे की प्रत्येक सदस्य फक्त त्याच्या घरात तयार केलेला पदार्थ खाईल. मात्र जेव्हा घरातील सदस्यांना समजलं की ईशानं (दिल हाऊस) विकीच्या ताटातून जेवण खाल्लं आहे, तेव्हा घरात गोंधळ उडाला. सगळ्यांना ईशाचा राग आला. त्यानंतर ईशानं सांगितले की, तिच्यासोबत खानजादी (दिमाख हाऊस) यांनीही विकीच्या (दिल हाऊस) ताटातील जेवण खाल्लं होतं.
अंकितानं उघड केलं विकी- खानजादीचं रहस्य : विकी आणि खानजादी या दोघांनीही याप्रकरणी नकार दिला. त्यानंतर अंकिता लोखंडेनं सांगितलं की, दिमाख हाऊसमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी बनवलेले अन्नही खानजादीनं खाल्लं, तेव्हा घरातील सदस्यांना राग आला. अंकिताचं हे बोलणं ऐकून विकीनं खुशीत तिची मान पकडली. अंकितानं त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्यानं मागून तिचा हात धरला. त्यानंतर अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली. अंकिताला विकीला पकडता न आल्यानं तिनं तिची दोन्ही पायातील चपला काढून विकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. अंकिताच्या या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले. घरातील सर्व सदस्य अंकिताला प्रोत्साहन देऊ लागले. यानंतर अंकिता तेथून निघून गेली.