मुंबई Anjali Arora :सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा ही तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळं खूप चर्चेत असते. 24 वर्षीय अंजलीनं मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. आता ती मुंबईला शिफ्ट होणार आहे. अलीकडेच तिनं तिच्या कुटुंबासह गृहप्रवेश पूजा केली होती. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत पूजा करताना दिसत आहे. यावेळी ती साध्या गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये आहे. व्हिडिओत तिचं आलिशान घर दिसत आहे. दरम्यान अंजली अरोराच्या या नवीन घरावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिला घराबाबत प्रश्न विचारत आहेत.
अंजली अरोरा झाली ट्रोल : व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, 'ती असे कोणते काम करते की तिला इतके पैसे मिळत आहे' दुसऱ्या एकानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'बाय द वे, ती कुठून एवढे पैसे कमावते?' आणखी एका यूजरनं लिहिलं, 'ही कुठली अशी नोकरी करत आहे की इतके पैसे कमवत आहे, काही तरी गडबड आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. सोशल मीडियावर सध्या तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. याशिवाय काहीजण या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. अंजली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 13.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.