मुंबई - Animal box office collection day 16 :अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या 'अॅनिमल'बद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 'अॅनिमल'च्या कलेक्शननं पहिल्याच आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्डब्रेक केले. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटानं अनेक विक्रम केले. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा अॅक्शन-पॅक्ड 'अॅनिमल' आता वीकेंडला पुन्हा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 16व्या दिवशी या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली ते जाणून घेऊया.
'अॅनिमल' चित्रपटाची कमाई :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 63.8 कोटीची कमाई केली आहे. आता गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली आहे. 'अॅनिमल'नं जगरात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. आज, 17 डिसेंबर रोजी, निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या 16 व्या दिवसाचा कलेक्शन शेअर केले आहे. या चित्रपटानं 16व्या दिवशी जगभरात 817.36 कोटींची कमाई केली आहे. देशांतर्गत या चित्रपटानं आतापर्यत 497.94 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीरशिवाय बॉबी देओलच्या अभिनयाने सर्वांनाच चकित केलं आहे. सध्या त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन
शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी
शनिवार दुसरा दिवस 66.27 कोटी
रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी
पहिला सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी
पहिला मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी
पहिला बुधवार सहावा दिवस 30.39 कोटी
पहिला गुरुवार सात दिवस 24.23 कोटी
पहिला आठवडा एकूण कलेक्शन 337.58 कोटी