मुंबई -Animal movie poster : रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दरम्यान आता निर्मात्यांनी या चित्रपटामधील काही खास पोस्टर शेअर करण्यास सुरुवात केली आहेत. चित्रपटामधील रणबीरचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान आता या चित्रपटामधील बॉबी देओलचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये बॉबी हा खलनायक साकारणार आहे. 'अॅनिमल' या चित्रपटामधील पोस्टरमध्ये बॉबी हा निर्दयी आणि कठोर दिसत आहे. या पोस्टरमध्ये त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे.
फर्स्ट लूक पोस्टर : यापूर्वी रश्मिका मंदाना, रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला होता. 'अॅनिमल' चित्रपटामध्ये अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. अनिलच्या व्यक्तिरेखेचं नाव बलवीर आहे. 'अॅनिमल' हा एक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी रश्मिका मंदान्नाचं फर्स्ट लूक शेअर केले होते. रश्मिका ही फर्स्ट लूकमध्ये पारंपरिक पोशाखात दिसली होती. तिनं कॉन्ट्रास्टिंग मरून आणि क्रीम कलरची साडी नेसली होती. या लूकमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत होतं. रश्मिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला.