मुंबई - Animal Box Office Collection Day 7 : अभिनेता रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला 'अॅनिमल' चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच हा चित्रपट दररोज अनेक विक्रम मोडत आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये राज्य करत आहे. 'अॅनिमल' पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत असून. या चित्रपटाचे शो सध्या हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अॅनिमल'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी पाचव्या दिवशी 37.47 आणि सहाव्या दिवशी 29.61 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 312.96 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या सातव्या दिवसात आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी हा चित्रपट 2.92 कोटीची कमाई करू शकतो. यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 315.49 कोटीवर पोहोचेल. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड वेगानं कमाई करत आहे. 'अॅनिमल' 'जवान' आणि 'पठाण' नंतरचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला. 'अॅनिमल'नं देशांतर्गत 6 दिवसात 300 कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. 'अॅनिमल'चं जगभरातील कलेक्शन पाहिल्यास या चित्रपटानं 500 कोटींची कमाई केली आहे.
'अॅनिमल'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन
शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी
शनिवार दुसरा दिवस ६६.२७ कोटी
रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी