महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनने केला 500 कोटीचा आकडा पार - बॉक्स ऑफिस

Animal box office collection : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल'नं देशांतर्गत 500 कोटीहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या 17व्या दिवशी देखील चित्रपटगृहांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

Animal box office collection
अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 8:27 AM IST

मुंबई - Animal box office collection : रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडत आहेत. संदीप रेड्डी वंगा आणि रणबीरच्या कॉम्बिनेशननं लोकांना इतके वेड लावले आहे की तिसर्‍या वीकेंडलाही थिएटरमध्ये आता हा चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. या चित्रपटाचा क्रेझ इतका आहे की, 'अ‍ॅनिमल'नं आता देशांतर्गत 500 कोटीचा आकडा सहज पार केला आहे. जगभरात या चित्रपटानं 772.33 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 1000 कोटी जगभरात कमाई करेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे.

'अ‍ॅनिमल'ची एकूण कमाई : 17 व्या दिवशीही 'अ‍ॅनिमल' शोला चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अ‍ॅनिमल'नं शनिवारी 12.8 कोटीची कमाई केली यानंतर या चित्रपटानं तिसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर 14.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. रविवारच्या कमाईसह चित्रपटाच्या एकूण कलेक्शननं 512 कोटींचा आकडा पार केला आहे. यासह रणबीरच्या करिअरमधला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे, ज्यानं 500 कोटींचा व्यवसाय केला आहे. अ‍ॅनिमल'नं फक्त जलद कमाईच केली नाही, तर शाहरुखच्या चित्रपटांच्या गतीशीही बरोबरी साधली.

अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन

शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी

शनिवार दुसरा दिवस 66.27 कोटी

रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी

पहिला सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी

पहिला मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी

पहिला बुधवार सहावा दिवस 30.39 कोटी

पहिला गुरुवार सात दिवस 24.23 कोटी

पहिला आठवडा एकूण कलेक्शन 337.58 कोटी

दुसरा शुक्रवार आठवा दिवस 22.95 कोटी

दुसरा शनिवार नव्वा दिवस 34.74 कोटी

दुसरा रविवार दहावा दिवस 36 कोटी

दुसरा सोमवार अकरा दिवस 13.85 कोटी

दुसरा मंगळवार बारावा दिवस 12.72 कोटी

दुसरा बुधवार तेरावा दिवस 10.25 कोटी

दुसरा चौदावा गुरुवार दिवस 8.75 कोटी

तिसरा पंधरावा शुक्रवार दिवस 8.3 कोटी

तिसरा सोळावा शनिवार दिवस 12.8 कोटी

तिसरा सतरावा रविवार दिवस 14.5 कोटी

अ‍ॅनिमल'चं एकूण 512.44 कोटी

हेही वाचा :

  1. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार
  2. 'सालार'च्या तुलनेत 'डंकी'ची बॉक्स ऑफिसवर मोठी आघाडी
  3. अनन्या पांडेनं शेअर केला तिचा बालपणीचा व्हिडिओ, चाहत्यांनी केल्या कमेंट्स

ABOUT THE AUTHOR

...view details