मुंबई - Animal Box Office Collection Day 12 : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 2023 मधील अॅक्शन ड्रामा 'अॅनिमल' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून अनेक चित्रपटांचे विक्रमही मोडीत काढत आहे. या चित्रपटानं दुसऱ्या वीकेंडला इतिहास रचला आणि दुसऱ्या रविवारी 'अॅनिमल'नं आमिर खानच्या 'दंगल'चाही विक्रम मोडीत काढला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या 12व्या दिवसात आहे. याशिवाय रणबीर कपूरच्या चित्रपटानं रिलीजच्या 11व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे जाणून घेऊया.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : रिलीजच्या 12व्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अॅनिमल'नं रिलीजच्या 11व्या दिवशी देशांतर्गत 13.85 कोटीची कमाई केली आहे. यासह 'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन 445.12 कोटीवर पोहोचलं आहे. हा चित्रपट लवकरच देशांतर्गत 500 कोटीची कमाई करेल. याशिवाय 'अॅनिमल'नं जगभरात 737.98 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' ही टी-सिरीज आणि भद्रकाली पिक्चर्सची निर्मिती आहे. 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'अॅनिमल' 2023चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. 'अॅनिमल' खूप झपाट्यानं कमाई करत आहे.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन
शुक्रवार पहिला दिवस 63.8 कोटी
शनिवार दुसरा दिवस ६६.२७ कोटी
रविवार तिसरा दिवस 71.46 कोटी
पहिला सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी
पहिला मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी
पहिला बुधवार सहावा दिवस 30.39 कोटी