मुंबई - Animal vs Sam Bahadur box office day 2 prediction: रणबीर कपूरचा चित्रपट 'अॅनिमल' आणि विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' एकाच दिवशी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या रुपेरी पडद्यावर जबरदस्त कामगिरी करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल', एक अॅक्शन-पॅक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रणबीर व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल,अनिल कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, सौरभ सचदेवा आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'अॅनिमल' चित्रपटामध्ये बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
'अॅनिमल' चित्रपटाची कमाई : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 61 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईत , दुसऱ्या दिवशी मोठी घसरण होण्याची अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट दुसऱ्या दिवशी 23.02 कोटीची कमाई करेल अशी शक्यता आहे. 'अॅनिमल'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रुपेरी पडद्यावर रिलीज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून रणबीरला खूप अपेक्षा आहेत. रुपेरी पडद्यावर 'अॅनिमल' लवकरच 100 कोटीची कमाई करेल असं सध्या दिसत आहे.