मुंबई - Animal Worldwide Collection: अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अॅनिमल'नं जागतिक स्तरावर उत्कृष्ट विक्रम केला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं शानदार व्यवसाय करत बॉक्स ऑफिसला हादरवले आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट खूप झपाट्यानं कमाई करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' रिलीज झाल्यापासूनच अनेक चित्रपटांचे विक्रम मोडत आहेत. 'अॅनिमल' चित्रपटाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया मिळत आहे. हा चित्रपट महिला विरोधी विकृत वागणूक आणि हिंसाचाराने भरलेला असल्याच्या काही प्रतिक्रिया आहेत.
'अॅनिमल'ने आणखी एक विक्रम मोडला : या चित्रपटावर इतक्या टीका होत आहेत, मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटानं आता जगभरातील कलेक्शनमध्ये 'संजू'चा विक्रम मोडला आहे. 'अॅनिमल'नं 8 व्या दिवशी जगभरात 600 कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या चित्रपटाची एकूण जागतिक बॉक्स ऑफिसवर 600.67 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या कलेक्शनसह 'अॅनिमल'नं जगभरात 587 कोटींची कमाई करणाऱ्या 'संजू'ला मात दिली. याआधी या चित्रपटानं 'ब्रह्मास्त्र', 'चेन्नई एक्सप्रेस', 'सिम्बा' यासारख्या अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
'अॅनिमल'नं जगभरात 600 कोटी क्लब घेतली एंट्री
'दंगल' 2023.81 कोटी
'जवान' 1148.32 कोटी
पठाण 1050.30 कोटी
'बजरंगी भाईजान' 969.06 कोटी
सिक्रेट सुपरस्टार 905.7 कोटी
'पीके'- 750 कोटी 'गदर 2'- 691 कोटी
'सुलतान'- 614 कोटी
'अॅनिमल'- 600.67 कोटी
हिंदी आणि साऊथ चित्रपट 600 कोटी क्लबमधील (जगभरात)
'बाहुबली' 2- 1810.59 कोटी
'आरआरआर' - 1387.26 कोटी
केजीएफ - 1250 कोटी
'2.0' चित्रपट - 699 कोटी
'जेलर' - 650 कोटी
'लिओ'- 612 कोटी
'बाहुबली' पार्ट 1- 650 कोटी
'अॅनिमल' कलेक्शन (देशांतर्गत आणि जगभरात)