Animal and Sam Bahadur Box Office Day 4 : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हे चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली कामगिरी करत आहेत. रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिस सध्या वादळ निर्माण करत आहे. या चित्रपटानं 3 दिवसात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसरीकडे 'सॅम बहादूर' चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 25 कोटींचा गल्ला जमवला आहे. दोन्ही चित्रपटांच्या रिलीजचा आजचा चौथा दिवस आहे.
'अॅनिमल' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार'अॅनिमल'नं आतापर्यंत देशांतर्गत 201.53 कोटीची एकूण कमाई केली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी 66.27 कमवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 71.46 कोटीचा गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या चौथ्या दिवशी 8.83 कोटीची कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय या चित्रपटानं जगभरात आतापर्यत 360 कोटींची कमाई केली आहे.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस शुक्रवार 63.8 कोटी
दुसरा दिवस शनिवार 66.27 कोटी
तिसरा दिवस रविवार 71.46 कोटी
चौथा दिवस सोमवार 8.83
एकूण कलेक्शन 210.36 कोटी