महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त वेग; रणबीर कपूरच्या चित्रपटानं रिलीजपूर्वी केली 20 कोटीची कमाई - अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Animal Advance Booking Day 5 : अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे.

Animal Advance Booking Day 5
अ‍ॅनिमल अ‍ॅडव्हान्स बुकिंग दिवस 5

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 2:41 PM IST

मुंबई - Animal Advance Booking Day 5 :अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरनं कहर केला आहे. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. 26 नोव्हेंबरपासून 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली. या चित्रपटानं 7 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री केली आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं आगाऊ बुकिंगमध्ये 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हिंदी शोसाठी 5,75,197 आणि तेलुगू शोसाठी 1,63,361 तिकिट विकल्या गेल्या आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग : 'अ‍ॅनिमल'नं दिल्लीतून 4.07 कोटी रुपये, तेलंगणातून 4.14 कोटी रुपये, महाराष्ट्रातून 3.29 कोटी रुपये, कर्नाटकातून 2.23 कोटी रुपये, गुजरातमधून 1.49 कोटी रुपये, आंध्र प्रदेशातून 2.18 कोटी रुपये आणि उत्तरप्रदेशमधून 1.34 कोटी रुपये कमावले आहेत. सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट देशांतर्गत 40 ते 50 कोटी आणि जगभरात 75 कोटींचा व्यवसाय करणार आहे. 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' यासारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे.

'अ‍ॅनिमल' पहिल्याच दिवशी कमाईत रेकॉर्डब्रेक करेल : 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीरसोबतच रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल,अनिल कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, सौरभ सचदेवा आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. 'अ‍ॅनिमल' रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विक्रम मोडेल अशी अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रुपेरी पडद्यावर रिलीज प्रदर्शित होणार आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटासोबत विकी कौशल स्टारर 'सॅम बहादुर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. 'सॅम बहादुर' चित्रपटाकडून विकीला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये विकीसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साकिब अयुब, मोहम्मद झीशान अय्युब आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील रंधावा पॅराडाइजमध्ये झाला होता खून ? जाणून घ्या सत्य
  2. इम्फाळमध्ये रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचा पारंपारिक पद्धतीनं विवाह सोहळा पडला पार
  3. 'कांतारा'च्या नावावर आणखी एक पुरस्कार; कन्नड चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details