मुंबई - Fighter Anil kapoor :अनिल कपूर , हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी 'फाइटर' चित्रपटात हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनिल कपूरचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अनिल कपूरचा दमदार अवतार पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा 'मिस्टर इंडिया' हा त्याच्या नुकत्याच आलेल्या 'अॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटात तो रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिका साकारत आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. 'फायटर'मध्ये अनिल कपूर हा ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंह ही भूमिका साकारत आहे.
अनिल कपूरचं फर्स्ट लुक : 'फाइटर' चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये अनिल कपूर हा पायलटच्या गणवेशात दिसत आहे. अनिल कपूरला हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या फिटनेससाठी ओळखलं जातं. अनिल कपूरनेही या चित्रपटामधील त्याच्या फर्स्ट लूकचं पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''सर तुम्हाला या चित्रपटासाठी शुभेच्छा' दुसऱ्या एकानं लिहिलं, तुम्ही खूप सुंदर अभिनय करता, हा चित्रपट नक्की हिट होईल''. याशिवाय आणखी एकानं लिहिल, ''खरा 'जवान' तर हा आहे'' अशा अनेक कमेंट या पोस्टरवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.