मुंबई - Animal Ka Enemy Bobby Deol : अभिनेता अनिल कपूरने मंगळवारी 'अॅनिमल' चित्रपटाचा सहकलाकार बॉबी देओलसोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर करुन चाहत्यांना ट्रीट दिली आहे. अनिलनं 'अॅनिमल का बाप अँड अॅनिमल का एनिमी पोजींग' असं कॅप्शन या फोटोला दिलंय. फोटोत अनिल आणि बॉबी आपले शरीर सौष्ठव दाखवत आहेत.
अनिल कपूरनं हा फोटो अपलोड करताच त्याच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. बॉबी देओलनंही या पोस्टवर रेड हार्ट इमोजी टाकला आहे. दोघेही हॉट दिसत असल्याचं एका चाहत्यांनं म्हटलंय. अनेकांना हा फोटो आवडलाय तर याच्या कॅप्शनलाही लोक दाद देताना दिसताहेत.
'अॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलाची भूमिका अनिल कपूरनं साकारली आहे. प्रत्येक माणसामध्ये आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठीची एक अंतःप्रेरणा असते. प्राणी कधीही अविचारानं वागत नाहीत. यामुळेच रणबीर साकारत असलेलेल्या पात्रावरुन चित्रपटाचं शीर्षक ठेवल्याचं एका ठिकाणी रणबीर कपूरनं सांगितलं होतं. त्यानुसार अनिल कपूर हा 'अॅनिमल'चा बाप आहे आणि बॉबी देओल यामध्ये खलनायक असल्यामुळे तो 'अॅनिमल' चा शत्रू आहे. या दोघांचा एकमेकांसोबतचा फोटो व त्याला दिलेलं कॅप्शन म्हणून चाहत्यांना आवडलं आहे.
दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी चित्रपटाचं नाव 'अॅनिमल' का ठेवलंय याचा खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला होता, "संदीप रेड्डी वंगा या चित्रपटाला 'अॅनिमल' असं शीर्षक दिलंय याचं कारण म्हणजे प्राणी अंतःप्रेरणेने वागतात. ते विचारांच्या बाहेर वावरत नाहीत. म्हणूनच मी साकारत असलेले हे पात्र त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी अंतःप्रेरणेने वागते. तो अंतःप्रेरणेने वागतो आहे असे त्याला वाटत नाही; तो आवेगपूर्ण आहे, आणि मला वाटते की 'अॅनिमल' हे शीर्षक तिथूनच आलं आहे आणि एकदा तुम्ही पहा हा चित्रपट या शीर्षकाला साजेसा आहे हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल."