मुंबई:अनिल कपूरची भूमिका असलेला राज मेहता दिग्दर्शित ‘जुगजुग जियो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, मनीष पॉल, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या सोबत संवाद साधला यावेळी बोलताना त्याने मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही. नेहमीच भूमिका चांगली वाटली तरच चित्रपटासाठी होकार देतो. मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही माझ्या कुटुंबाने मला नेहमीच ताकत दिली. आणि हो, मी स्वतःची काळजी घेत आलो आहे, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही अशी ही माहिती त्याने यावेळी बोलताना सांगितली.
इतकी वर्षे ‘रिलेटेबल’ राहणे नक्कीच कौतुकास्पद आहे. कसं काय मॅनेज करता? :कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा. मी जे काही करतो ते आत्मीयतेने करतो. तुझ्यासोबत इंटरव्हू देताना मी तासनतास बोलू शकतो. कारण इंटरव्ह्यू देणं माझं काम आहे असं मी मानतो आणि ते मी एन्जॉय करतो. इतरांना कदाचित कंटाळा येत असेल मुलाखती द्यायला पण मी तब्बल ६-७ तास सहजपणे बोलू शकतो. माझ्या करियरमध्ये माझ्या वाट्याला चांगल्या फिल्म्स आल्या, छान छान कथानकं मिळाली, उत्तम दिग्दर्शक मिळाले त्यामुळे माझा करियर ग्राफ वर राहिला. महत्वाचे म्हणजे योग्यवेळी योग्य चित्रपटाला मी होकार दिला त्यामुळे माझ्या नावावर बरेच हिट चित्रपट आहेत. काही फ्लॉप्स असतील पण हिट चित्रपटांची संख्या खूप जास्त आहे. मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही. नेहमीच भूमिका चांगली वाटली तरच चित्रपटासाठी होकार दिलाय. तसेच माझ्या सभोवतालची लोकं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारी होती, आहेत. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच ताकत दिली. आणि हो, मी स्वतःची काळजी घेत आलो आहे, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही.
तुमच्या ‘जुगजुग जियो’ मधील भूमिकेबद्दल काय सांगाल? :चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव भीम आहे. तो एक व्यावसायिक आहे जो खालून वर आला आहे आणि मोठे यश मिळविले आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. परंतु त्याच्या वैवाहिक आयुष्यात ‘मिड-लाईफ क्रायसीस’ आलीय. त्याला तोचतोचपणाचा उबग आला आहे. तो सामान्य जीवनाला कंटाळला आहे. त्याला वेगळी मजा करायची आहे आणि बायकोला घटस्फोट द्यायचा आहे. त्याच सुमारास त्याचा नवविवाहित मुलगाही घटस्फोटाचा विचार करतोय आणि आपल्या वडिलांचा निर्णय ऐकून शॉक मध्ये आहे. या सर्वापासून त्याची पत्नी अनभिज्ञ आहे. हे सर्व तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेच असेल. ‘जुगजुग जियो’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच एक महत्वाचा संदेशही देईल, तुम्हाला हसवत हसवत.