महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Angad Bedi Birthday: लग्नापूर्वी ७५ मुलींना डेट करत होता अंगद बेदी, वाढदिवसानिमित्त वाचा त्याच्या अनोख्या गोष्टी - Neha Dhupia shocked

अंगद बेदी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने एका मुलाखतीत लग्नापूर्वी ७५ मुलींना टेड केल्याचे सांगितले होते. हा खुलासा त्याने त्याची पत्नी नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या चॅट शोमध्ये केला होता.

Angad  Bedi Birthday
Angad Bedi Birthday

By

Published : Feb 6, 2023, 1:48 PM IST

मुंबई - अभिनेता अंगद बेदी आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ फेब्रुवारी १९८३ ला दिल्लीत जन्मलेला अंगद हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. सहाजिकच क्रिकेटची आवड त्याला लहानपणापासूनच होती. विशेष म्हणजे अंगदने क्रिकेटमध्ये करियर करण्याचे स्वप्न मध्येच सोडून दिले. तो बेदी 19 वर्षाखालील क्रिकेट खेळला आहे. मात्र दरम्यान त्याची आवड मॉडेलिंगमध्ये निर्माण झाली आणि त्याच्या आयुष्याची दिशा बदलली.

अंगदचे क्रिकेटपेक्षा अभिनयाला प्राधान्य - मॉडेलिंग करत असतानाच त्याने अभिनयाचे धडेही गिरवायला सुरुवात केली होती. शशी कुमार दिग्दर्शित काया तरन या चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर झळकला आणि त्यानंतर अंगद एनएस माधवनच्या मल्याळम चित्रपट वनमारंगल वीझुम्पोल मध्ये चमकला. अंगदने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये फालतू, पिंक, डिअर जिंदगी आणि टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. वनमारंगल वीझुम्पोल या मल्याळम चित्रपटातील अंगद बेदीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

अंगद बेदीचे नेहा धुपियाशी लग्न - अंगद बेदीने 10 मे 2018 रोजी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न केले. दोन्ही कलाकारांनी एकमेकांना बराच काळ डेट केले होते. अखेर 2018 ला त्याने नेहाशी लग्नगाठ बांधली आणि एकत्र सहप्रवास सुरू केला. विशेष म्हणजे, नेहा धुपिया अंगद बेदीपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी आहे. अंगदला दोन मुले आहेत. असे म्हटले जाते की नेहा धुपिया लग्नापूर्वी गर्भवती होती, कारण लग्नानंतर केवळ सहा महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला होता.

अंगदने लग्नापूर्वी केले 75 मुलींना डेट- अंगद बेदीने एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टींचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याने लग्नापूर्वी 75 मुलींना डेट केले आहे. खरंतर अंगद बेदीने नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या चॅट शोमध्ये याचा खुलासा केला. तसेच, या 75 मुलींच्या यादीमध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक मुली असल्याचेही त्याने सांगितले होते.

अंगदची क्रिकेटर युवराज सिंगशी दोस्ती- अंगदने नेहाच्या शो दरम्यान सांगितले की, तो खूप कडक शिस्तीत वाढला आहे. मुंबईला येईपर्यंत तो खूप शामळू होता. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक नवे बदल झाले. त्याला असंख्य नवे मित्र आणि मैत्रीणी मिळाल्या. याच काळात त्याने अनेक मुलींना डेट केले. काही मुली तर त्याच्याहून १० वर्षे वयांनी मोठ्या होत्या. विशेष म्हणजे क्रिकेटर युवराज सिंग हा त्याचा लहानपणीचा मित्र आहे. दोघांनी एकत्र क्रिकेटचा सरावही केला आहे.

हेही वाचा -Lata Mangeshkar Sand Sculpture: लता मंगेशकर यांचे पुरी बीचवर साकारले भव्य वाळूचे शिल्प

ABOUT THE AUTHOR

...view details