मुंबई : लोकप्रिय अँकर आणि अभिनेत्री अनसूया भारद्वाज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या जरी ती अभिनयात सक्रिय नसली तरीही ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर न चुकता शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत. अनेकदा तिला तिच्या पोस्टमुळे ट्रोलिंगला सामोरी जावे लागते. अनसूयाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रडली आहे. अनसूया या व्हिडिओत खूप भावूक झाली आहे.
अनसूया भारद्वाजची पोस्ट झाली व्हायरल : अनसूया भारद्वाजने या व्हिडिओला एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने लिहले 'मला आशा आहे की प्रत्येकजण चांगले करत आहे. सुरुवातीच्या काळात मला वाटायचे की सोशल मीडिया हे जगातील प्रत्येकाला जोडण्याचे व्यासपीठ असेल. मला वाटले की याठिकाणी माहितीपूर्ण सामग्री, अनुभव, संस्कृती, जीवनशैली शेअर करणे आणि आनंद पसरवणे हे या प्लेटफॉर्मसाठी उपयुक्त ठरेल'. पुढे तिने सांगितले, की हा तिच्या आयुष्यात काही कमजोर क्षण आहे.
अनुसया भारद्वाज झाली नाराज : 'मी माझे फोटो शूट, पुनरागमन आणि बरेच काही पोस्ट सोशल मीडियावर करते. हे सर्व माझ्या आयुष्याचा भाग आहेत. मी हे सर्व तुमच्यासोबत शेअर करत आहे. अनसूयाने लिहिले की, मी उदास होते आणि रडले. 'एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून माझ्या कोणत्याही मुद्द्यावर तटस्थपणे प्रतिक्रिया देण्याचा आणि माझ्या भावना व्यक्त करण्याचा दबाव माझ्यावर असतो,' मी हा व्हिडिओ आपली कमकुवतपणा दाखवण्यासाठी पोस्ट करत नाही, तर एखाद्या समस्येचा सामना करताना पुन्हा मजबूत होण्याची इच्छा व्यक्त करत हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. याशिवाय समस्यांपासून कोणीही पळून जाऊ नये, असा सल्ला तिने दिला आहे. अनुसयाने सोशल मीडियावर द्वेष आणि नकारात्मकतेबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.
चाहत्यांनी पोस्टवर केल्या कमेंट :हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वीचा असून आता ती ठीक असल्याचे अनुसयाने सांगितले. मात्र, अनसूयाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नेटिझन्स वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत की, 'अनसूया, तुला काय झालं, तुला रडताना पाहून खूप वाईट वाटले.' याशिवाय काहीजण हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत आहे. याशिवाय काही तासापूर्वी अनुसयाने आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती खूप धैर्यवान असल्याचे सांगत तिने तिच्या चाहत्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान आता अनसूया अँकरिंगपासून दूर आहे. अनुसया सध्या 'पुष्पा २: द राइज' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा :
- Alia Bhatt and Ranbir Kapoor : आलिया भट्ट-रणबीर कपूर निघाले सुट्टीला.. मुंबई विमानतळावर झाले स्पॉट!
- Hema Malini : 'गदर २' चित्रपट कसा वाटला, सनी देओलच्या सावत्र आईने 'ही' दिली प्रतिक्रिया
- OMG 2 Box Office Collection Day 9 : 'गदर 2 'शी टक्कर असतानाही अक्षय कुमारचा ओएमजीचा १०० कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश