महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'खो गए हम कहाँ' सक्सेस पार्टीत चमकले अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव - सक्सेस पार्टीत चमकले अनन्या पांडे

Kho Gaye Hum Kahan success bash : 'खो गए हम कहाँ' चित्रपटाला ओटीटीवर मिळालेले सकारात्मक स्वागत लक्षात घेऊन, त्याच्या निर्मात्यांनी मुंबईत एक सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. यातील मुख्य कलाकार अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव या कार्यक्रमात त्यांच्या उत्कृष्ट लूकमध्ये दिसले.

Kho Gaye Hum Kahan success bash
'खो गए हम कहाँ' सक्सेस पार्टी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 11:44 AM IST

मुंबई - Kho Gaye Hum Kahan success bash : 'खो गए हम कहाँ' या चित्रपटातून अर्जुन वरैन सिंगने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियाच्या युगात जीवन, मैत्री आणि प्रेम यातून मार्गक्रमण करणाऱ्या तीन मित्रांची कथा मांडणारा हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिल्याने निर्मात्यांनी मंगळवारी सक्सेस पार्टीचे आयोजन केलं होतं.

सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांनी 'खो गए हम कहाँ' या आगामी चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले. तीन आठवड्यांपूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. समीक्षक आणि चाहत्यांनी चित्रपटाला सकारात्मक रिव्हयू दिले आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट स्ट्रीमिंग क्रमवारीत शीर्षस्थानी पोहोचला आहे. हे यश साजरं करण्यासाठी मुंबईत एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीत अनेक निर्माते आणि इतर प्रतिष्ठीतही सहभागी झाले होते.

या पार्टीत अनन्या, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श त्यांच्या उत्कृष्ट फॅशन लूकमध्ये आले होते. त्यांनी पार्टीच्या ठिकाणाच्या प्रवेशद्वाराबाहेर पापाराझींसाठी पोझ दिली. अभिनेत्री अनन्या काळ्या-पट्टेदार मिनी ड्रेसमध्ये उत्सवात आली होती. गली बॉय स्टार सिद्धांत चतुर्वेदी काळ्या टी-शर्टमध्ये डॅशिंग दिसत होता. दुसरीकडे आदर्श गौरवने काळ्या रंगाची पँट आणि ट्रेनरसह निळा शर्ट परिधान केला होता.

एक्सेल एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि टायगर बेबीच्या रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी हा चित्रपट निर्माण केला आहे. यात मलायका अरोरा, फरहान अख्तर आणि सपन वर्मा यांच्या कॅमिओसह कल्की कोचलिन आणि अन्या सिंग देखील आहेत. 'खो गए हम कहाँ', चित्रपट स्ट्रीमिंग साइटवर पहिल्या आठवड्यात 6.3 दशलक्ष तास पाहिला गेला. याने OTT प्लॅटफॉर्मच्या टॉप टेन इंग्रजीत्तर चित्रपट श्रेणींमध्ये देखील स्थान मिळवले आहे. 26 डिसेंबरला त्याचा प्रीमियर सुरू झाला होता.

हेही वाचा -

  1. पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं'च्या दुसऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
  2. रामायण फेम कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलियाचे अयोध्येत आगमन
  3. आलिया भट्टच्या मताशी दीपिका पदुकोण सहमत, '12th Fail' वर केला कौतुकाचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details