मुंबई - Ananya Panday childhood video : अभिनेत्री अनन्या पांडे बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. अनन्यानं सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये अनन्या माकडाची कविता वाचताना दिसत आहे. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये अनन्या खूपच क्यूट दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी भाऊ अहान पांडे तिला ढकलतो. अनन्या रडण्याऐवजी हसते. आईनं विचारल्यावर ती सांगते की अहाननं तिला ढकललं. अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
अनन्या पांडेनं शेअर केला व्हिडिओ : बालपणीची ही क्लिप शेअर करत अनन्यानं बेडूक इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिलं, ''पहिल्या दिवसापासून एन्थू कटलेट.' व्हिडिओमध्ये छोटी अनन्या इंग्रजीत कविता खूप मजेत वाचत आहे. आता या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. करिश्मा कपूरनं या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं लिहिलं की, ''ती त्या क्षणी खूप निरागस होती. आता ती बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अनन्या तु खूप सुंदर दिसत आहेस, तुझा हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे''. आणखी एका चाहत्यानं लिहिल, ''अहान पांडे तू तिला धक्का का मारला''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.