मुंबई- Ananya Pandey drew attention : लंडनमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर बॉलिवूड लव्हबर्ड्स आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे घरी परतले आहेत. त्यांची सुट्टी संपली असली तरी त्यांच्या सुट्टीतील फोटोंनी सोशल मीडिया व्यापून गेला आहे. अनन्याने भरपूर फोटो शेअर केले असले तरी फोटोमध्ये आदित्यची छबी मात्र दिसत नाही.
शुक्रवारी अनन्याने तिच्या नवीन वर्षाच्या सुट्टीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या फोटोत अनेक संस्मरणीय क्षण टिपलेले पाहायला मिळतात. एका फोटोत ती बेलचे बटन दाबताना दिसते. यात "कृपया लक्ष वेधण्यासाठी घंटी वाजवा" ही अक्षरे भिंतीवर कोरलेली दिसत आहेत. इन्स्टग्रामवरील या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!! मला माहित आहे की मला थोडा उशीर झाला आहे. पण अहानाने 'खो गये हम कहाँ' च्या शेवटी म्हटल्याप्रमाणे - ही वेळ रीबूट करण्याची आहे आणि काही संकल्पही करण्याची आहे. प्रत्येक वर्षी आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत असतो, मला खात्री आहे की यावर्षी तुम्ही पूर्णपणे स्वतःचे बनू शकाल."
दरम्यान, यूकेमध्ये आइस स्केटिंगच्या अॅडव्हेंचरमध्ये आनंद लुटताना अनन्या आणि आदित्यच्या व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यापूर्वी या कथित जोडप्याचे मित्रांसोबत पोज देतानाचे फोटो दिसले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारलेलंही नाही. 2022 मध्ये क्रिती सॅनॉनच्या दिवाळी पार्टीत जेव्हा ते एकत्र आले तेव्हा अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. अलिकडेच या दोघांनी अनन्याचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला भेट दिली होती.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर स्पेनमध्ये दिसले होते एकत्र : काही महिन्यापूर्वी अनन्याने इंस्टाग्रामवर स्टोरीजवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती स्पेनमधील कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसली होती. फोटो शेअर करत तिने लिहले, 'यात माझ्या आवडत्या गाण्यासारखे काहीही नाही.' तिने फोटोत माद्रिद, स्पेनचे जिओटॅग वापरले होते. त्याचवेळी आदित्यने कॉन्सर्टमधील कलाकारांचा एक व्हिडिओ शेअर केला. यावरुन हे जोडपे स्पेनमध्ये या कार्यक्रमासाठी एकत्र होते असा अनेकांनी तर्क केला होता.
हेही वाचा -
- जान्हवी कपूरने शिखर पहारियासोबत दिली तिरुपतीला भेट, म्हणते "आता सुरू झाले 2024"
- 'निडर, अग्निमय' दीपिका पदुकोणसाठी 'फायटर'च्या टीमनं शेअर केली वाढदिवसाची लक्षवेधी पोस्ट
- ''थोडं गूढ आहे पण छान आहे'' म्हणत, इलियाना डिक्रूझने मायकेल डोलनसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा