मुंबई - Ananya Panday celebrates Halloween : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं, तिचा 25 वा वाढदिवस मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर रोमँटिक वातावरणात साजरा केला. तिच्यासोबत तिचा कथित प्रियकर आदित्य रॉय कपूर असल्याची चर्चाही रंगली आहे. वाढदिवसाच्या सेलेब्रिशननंतर अनन्यानं तिच्या हॅलोविन उत्सवाची झलक शेअर केलीय.
बुधवारी सकाळी अनन्यानं तिच्या इंस्टाग्रामवर, काल रात्री पार पडलेल्या बर्थडे सेलेब्रिशनचे फोटो अपलोड केलेत. यावेळी तिनं पांढरा टँक टॉप परिधान करत मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यावर टिपलेल्या क्लोज-अप शॉट्सची स्ट्रिंग पोस्ट केली आहे. सुंदर फोटोंसाठी तिनं कॅप्शन देताना लिहिलंय, 'समुद्रकिनाऱ्यावर एक डायन, स्पेशल स्पेशल हॅलोवीन.'
तिच्या हॅलोविन फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्यांना म्हटलंय, 'खूप सुंदर आणि छान दिसत आहेस, फक्त एक WOOOOWW आनंदी हॅलोवीन आहे.' इतरांनी तिच्या मोहित करणाऱ्या सौंदर्याची प्रशंसा केलीय आणि तिला हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या. तिला सदिच्छा देणाऱ्यामध्ये अनन्याची आई भावना पांडे देखील सामील झाली आणि कमेंट विभागात लाल हार्ट इमोजी टाकून तिनं आपलं प्रेम व्यक्त केलंय.
अलीकडेच, अनन्या आणि आदित्य यांना मुंबई विमानतळावर स्वतंत्रपणे जाताना पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. दोघेही विमानतळावर स्पॉट होण्यापूर्वी एकत्र डिनर घेतानाही दिसले होते. विशेष म्हणजे, दोघांनीही योगायोगाने सारखेच काळे पोशाख परिधान करत सहवासाचा आनंद घेत गप्पा गोष्टी केल्या होत्या.