आनंद महिंद्रांनी केले '12 th फेल'चे कौतुक, विक्रांत मॅसी राष्ट्रीय पुरस्कारास पात्र असल्याचे दिला निर्वाळा
Anand Mahindra reviews 12th Fail : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी '12th फेल' चित्रपट पाहिला आहे. उद्योगपती महिंद्रा विक्रांत मॅसीच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारास पात्र असल्याचे म्हटले आहे.
मुंबई- Anand Mahindra reviews 12th Fail विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 th फेल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटींनी सत्यकथेवर आधारित चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले. चित्रपट पाहणाऱ्यांच्या या यादीत देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. आनंद महिंद्रा यांनी '12वी फेल'चे कौतुक केले. यासोबतच महिंद्रा हे विक्रांत मॅसीच्या अभिनयावरही खूप प्रभावित झाले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करून आनंद महिंद्रा यांनी केवळ चित्रपटाचेच नाही तर '12 th फेल' टीमचेही कौतुक केले. X हँडल आनंद महिंद्रा यांनी लिहिले," 'शेवटी '12 th फेल' चित्रपट गेल्या वीकेंडला पाहिला. तुम्ही या वर्षी फक्त एकच चित्रपट पाहणार असाल तर तो नक्की हाच आहे."
यासोबतच बारावीत नापास होण्यात काय विशेष आहे हे त्यांनी तीन मुद्द्यांमधून स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरुन त्यांनी एक प्रकारे '12 th फेल' चित्रपटाचे उत्तम समीक्षणच केल्याचं दिसतंय. हे तीन मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
1) कथानक : ही कथा देशातील वास्तविक जीवनातील नायकांवर आधारित आहे. केवळ नायकच नाही, तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत, जे जगातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण अडचणींविरुद्ध संघर्ष करतात.
2) अभिनय: विधू विनोद चोप्राने कास्टिंगमध्ये उत्तम काम केले आहे. प्रत्येक पात्र आपल्या भूमिकेत स्थिरावले आहे आणि गांभीर्यासोबतच तो भावनाही अचूकपणे मांडत आहे. विक्रांत मॅसीचे कौतुक करताना आनंद महिंद्रा म्हणाले की, विक्रांत मॅसीने उत्कृष्ट अभिनय केला आहे, जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारास पात्र आहे. विक्रांत चित्रपटात फक्त अभिनय करत नव्हता तर तो ती भूमिका जगत होता.
3 ) कथनशैली: विधू चोप्रा आपल्याला आवर्जून आठवण करून देतात की महान सिनेमा हा उत्तम कथांवर आधारित असतो. विशेष म्हणजे स्पेशल इफेक्ट्स आणि चांगल्या प्रकारे सांगितलेल्या कथेची साधेपणा आणि सत्यता याला टक्कर देता येत नाही. यासोबतच महिंद्रा पुढे म्हणाले की, 'माझ्यासाठी चित्रपटातील सर्वात अप्रतिम सीन मुलाखतीदरम्यानचा होता. होय, हे थोडेसे कृत्रिम वाटू शकते, परंतु खोल संवाद स्पष्टपणे आपल्या डोळ्यांवर आदळतात आणि नवीन भारत घडवण्यासाठी देशाला काय करण्याची आवश्यकता आहे हे दर्शवते.